Video:संभाजी भिडे म्हणतात, ‘एकादशीला उपग्रह सोडल्याने अमेरिका यशस्वी’

टीम ई-सकाळ
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

सोलापूर : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांचे एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भिडे यांनी भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेवर प्रतिक्रिया दिली आहे. सोलापुरात इलेक्ट्रॉनिक मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद आव्हाड यांनी भिडे यांचे वक्तव्य ट्विटर अकाऊँटवरून शेअर केले आहे.

सोलापूर : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांचे एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भिडे यांनी भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेवर प्रतिक्रिया दिली आहे. सोलापुरात इलेक्ट्रॉनिक मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद आव्हाड यांनी भिडे यांचे वक्तव्य ट्विटरवरून शेअर केले आहे.

Video: पाकने केले यशस्वी रॉकेट लाँचिंग; ‘सर्किट’ने शेअर केला व्हिडिओ​

वृत्तवाहिनीला दिली प्रतिक्रिया
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, संभाजी भिडे म्हणाले की, अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडल्यामुळे त्यांची मोहीम यशस्वी झाली. एकादशी दिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते, असा दावा संभाजी भिडे यांनी केला आहे. भिडे म्हणाले, ‘भारतीय कालमापन पद्धती जगात सर्वोत्तम आहे. त्यामुळे अमेरिकेने याचा वापर केला. त्यांचा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयोग यशस्वी झाला. कारण, त्यांनी एकादशीला उपग्रह सोडला होता. अमेरिकेने ३८ वेळा प्रयोग केला. पण, ते अयशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी भारतीय कालमापन शास्त्राचा अभ्यास केला आणि पुढचा उपग्रह एकादशी दिवशी सोडला. एकादशीला अवकाशातील स्थिती उत्तम असते. त्यामुळे त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला.’ नवरात्रोत्सवात सोलापुरात दुर्गामाता दौड होणार आहे. त्याच्या नियोजनासाठी संभाजी भिडे सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी चांद्रयान-२ या विषयावर एका वृत्तवाहिनीसाठी संवाद साधला होता.

आणखी वाचा : काँग्रेसची आता चर्चाच बंद : आंबेडकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडे यांचे वक्तव्य ट्विटरवर शेअर केले आहे. आता आव्हाड यांच्या ट्विटरवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. देशाला अंधश्रद्धाळू बनवू नका, असा सल्ला एकाने या ट्विटवर दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambhaji bhide reaction on chandrayaan 2 jitendra awhad twitter solapur