
Mumbai Latest News: मंत्रालयातून एक धक्कादायक माहिती पुढे येत असून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मंत्रालयात घुसले आहेत. मंत्रालयात जाताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत तरुणांना ताब्यात घेतलं.