मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार ; छत्रपती संभाजीराजेंचा गंभीर आरोप

Sambhaji Chatrapati
Sambhaji Chatrapati esakal
Updated on

विनायक मेटेंच्या कारला अपघात झाल्यानंतर एक तास उशिराने मदत पोहोचली. याच कारणावरून छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. अपघात झाल्यावर आपत्कालीन मदत मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे काय नियमावली आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.(Sambhaji Chatrapati Alleges Central And State Government Is Responsible For Death Of Vinayak Mete )

Sambhaji Chatrapati
Vinayak Mete: विलासराव देशमुख म्हणायचे,"मेटेंना वाऱ्याची दिशा अचूक कळते"

मराठा आरक्षण मिळावे यासाठी पाठपुरावा करणारे आमदार विनायक मेटे याचे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्यानंतर एक तास उशिराने आपत्कालीन मदत पोहोचली. यानंतर राज्यस्तरातून त्यांच्या वर श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्या मृत्यूला संभाजी राजेंनी राज्य आणि केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे.

विनायक मेटे यांना मी श्रद्धांजली वाहतो. सरकारने जी चौकशी करायची आहे ती करावी. विनायक मेटे यांच्या मृत्यूला केंद्र तसेच राज्य सरकार जबाबदार आहे. अपघात झाल्यानंतर मेटे यांना एक तास उशिराने आपत्कालीन मदत मिळाली. सरकारकडे आपत्कालीन सुविधा पुरवण्याची काय नियमावली आहे. असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.

मुंबई-पुणे या मार्गावर रहदारी असते. येथे आपत्कालीन मदत पोहोचविणाऱ्या दोन ते तीन गाड्या असायला हव्यात. अशी अचानक घटना घडली तर मदत पोहोचावी म्हणून केंद्र तसेच राज्य सरकारने योग्य ती तरतूद करायला हवी,” अशी मागणीदेखील संभाजीराजे छत्रपती यांनी केली

Sambhaji Chatrapati
तेव्हा मुंडे आता मेटे, मराठवाड्याच्या नेत्यांच्या अपघाती मृत्यू मागे संशयाचं धुकं कायम

विनायक मेटे मराठवाड्याचे सुपुत्र आणि मराठा समाजाची शान होते. आज ते आमच्यातून निघून गेले आहेत. हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. ही पोकळी कशी भरून निघेल याचे उत्तर आमच्याकडे नाही. बीडसारख्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीतून ते आले. गरीब मराठा समाजाला झळ बसू नये यासाठी त्यांचा लढा सुरू होता. विनायक मेटे यांनी मराठा समजाची बाजू प्रभावीपणे मांडली. मोठे बंधू म्हणून ते मला नेहमी सल्ला द्यायचे. सरकारवर दबाव टाकायचा असेल तर आपण एकत्र येणे गरजेचे आहे, असे ते नेहमी सांगायचे, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी मेटेंच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com