

Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमामध्ये राजेशिर्के बंधूंनी संभाजी महाराजांना मुघलांना पकडून दिलं, असं दाखवण्यात आलेलं आहे. यापूर्वी असाच इतिहास सर्वश्रूत आहे. परंतु या घटनेची दुसरी मांडणी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत करतात. स्वराज्यातल्या ब्राह्मण सरकारकूनांनी संभाजी महाराजांविरोधात कटकारस्थान रचून मुघलांना कैद करवून दिलं, असं ते सांगतात.