मुंबई - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी-आमणे या शेवटच्या टप्प्याचे आज लोकार्पण झाले. ५५ हजार ३३५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प पूर्ण होता होता. तब्बल ६१ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याबाबतची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता.