Samruddhi Highway Route : समृद्धी महामार्गावर मिळणार केवळ याच वाहनांना प्रवेश

राज्यातील एक सर्वात वेगवान महामार्ग अशी ओळख असणारा समृद्धी महामार्ग
Samruddhi Highway Route
Samruddhi Highway Routeesakal

Samruddhi Highway Route : राज्यातील एक सर्वात वेगवान महामार्ग अशी ओळख असणारा समृद्धी महामार्ग आता वाहतुकीसाठी खुला असला तरी यापुढे या मार्गावर कोणती वाहनं प्रवास करणार यासाठी काही नियम लागू केले आहेत. या महामार्गावर अपघातांना आळा घालण्यासाठी जे देखील वाहन यावर प्रवास करणार त्याची संपर्ण तपासणी आधी केली जाणार असून वाहन सुस्थितीत असेल तरच महामार्गावर प्रवेश दिला जाणार आहे.

Samruddhi Highway Route
Airtel Prepaid Plans : आता Airtel 455 Plan वर मिळवा 'हे' बेनिफिट्स

विविध जिल्ह्यातून जाणारा हा समृद्धी महामार्ग बुलढाण्यातून देखील जातो. दरम्यान तेथील सिंदखेड राजा टोल प्लाझावर आज सकाळपासून उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे .

Samruddhi Highway Route
Food Messaging Apps : महिला स्मार्टफोनवर नेमकं काय सर्च करतात? बॉबल एआयचा रिपोर्ट आला समोर

समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग आता ॲक्शन मोडमध्ये आला असून आता सिंदखेड राजा येथील टोल नाक्यावर समृद्धी महामार्गावर प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची आधी कसून तपासणी करण्यात येत आहे.

Samruddhi Highway Route
Seatbelt In Auto Rickshaws : आता रिक्षातही लावावा लगणारा सीटबेल्ट

या तपासणीत वाहनांचे टायर्स , वाहनांची परिस्थिती , वाहनांचा आवाज , सीट बेल्ट इत्यादी बाबी तपासून जर सुस्थितीत वाहन असेल तरच समृद्धी महामार्गावर प्रवेश देण्यात येणार आहे . गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे.

Samruddhi Highway Route
Volkswagen Electric SUV ID.4 GTX : आता बाजारात येणार फोक्सवेगनची इलेक्ट्रिक एसयूव्ही, मिळणार पॉवरफुल फीचर्स

मागील काही महिन्यात समृद्धी महामार्गावर जवळपास 17 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे . त्यामुळे आता वाहन तपासणी मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत झालेल्या अनेक अपघातात टायर फुटून तर कुठे वाहन चालकाला झोप लागल्याने अपघात झालेले आहेत. म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाने आता चालकांसाठीही समुपदेशन सुरू केलं आहे.

Samruddhi Highway Route
Automobile : क्रेटापासून ते व्हेन्यूपर्यंत सगळ्या कारमध्ये मिळणार हे सेफ्टी फिचर्स

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर त्यावर अपघातांचं प्रमाण वाढलं. त्यामुळे आता आरटीओ अर्थात परिवहन विभाग ॲक्शन मोडमध्ये आला असून अनेक उपाययोजना करत आहे. यातीच एक उपायोजना हणून आरटीओ विभागाने आज संपूर्ण महामार्गावर वाहनांची तपासणी खासकरुन टायरची तपासणी, सीट बेल्ट लावण्याबद्दल जनजागृती अशा गोष्टी केल्या.

Samruddhi Highway Route
2023 KTM 250 Adventure बाइक मार्केट मध्ये दाखल, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

तसंच नियम न पाळणाऱ्या वाहनांना समृद्धीवर प्रवास करण्यापासून रोखण्यात आलं. दरम्यान अशा प्रकारचं अंमलबजावणी सत्र समृद्धी महामार्गावर राबवलं जात आहे. त्यामुळे आता यापुढे आपण समृद्धी महामार्गावर प्रवास करण्याकरता निघत असल्यास सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

Samruddhi Highway Route
Vivo X90 Series : Vivo X90 फ्लॅगशिप फोन लॉन्च, मिळेल 8 हजारांची सूट

समृद्धी महामार्गावर वाहकांच्या निष्काळजीपणामुळे किंबहुना काळजी न घेता सुसाट वाहन चालवण्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत . त्याकरता फक्त वाहनांवर वेग नियंत्रित न करता वाहन चालकांना त्यांच्या मनावर देखील वाहन चालवताना ताबा ठेवणे तेवढेच गरजेचे झालं आहे. ज्या पद्धतीने समृद्धी महामार्ग आपल्याला मिळाला आहे, त्याचा तसाच योग्य वापर करणं गरजेचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com