Samruddhi Mahamarg Accident : अपघातग्रस्त बसमधून बाहेर पडले अन् ट्रकची धडक; एक ठार २० जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samruddhi Mahamarg Accident

Samruddhi Mahamarg Accident : अपघातग्रस्त बसमधून बाहेर पडले अन् ट्रकची धडक; एक ठार २० जखमी

बुलडाणा - मागील काही दिवसांपासून राज्यातील अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. राज्यातील सर्वात वेगवान महामार्ग म्हणून ओळख असलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका सुरू आहेत. रात्री खासगी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाच्या मृत्यू झाला. तर २० प्रवासी जखमी झाले. (Samruddhi Mahamarg Accident news in Marathi)

हेही वाचा: Brij Bhushan Singh : बृजभूषण यांच्याविरोधात मनसे आक्रमक; लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून...

नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणारी खासगी बस देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ उलटली. अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

रात्री बस समृद्धी महामार्गावर मध्यभागी उलटली. त्यानंतर अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर निघून महामार्गाच्या बाजूला जात होते. प्रवासी रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना धडक दिली. यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर एक प्रवासी गंभीर जखमी आहे.

टॅग्स :accident