शहापूर (वार्ताहर) : मुंबई-नागपूर समृद्धी शीघ्रगती महामार्गाचा ठाणे जिल्ह्यातील आमणे ते इगतपुरी हा ७६ किमीचा शेवटचा टप्पा ५ जून रोजी वाहतुकीसाठी खुला करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील आमणे येथे न घेता त्याऐवजी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे करण्यात येणार आहे.