
कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले होते, फसवणूक तसेच मानसिक, शारीरिक आणि छळ केल्याचा आरोप महिलेने केला. पण आता सिद्धांत शिरसाट यांच्याविरोधातील नोटीस मागे घेणार असल्याचं म्हणत महिलेनं या प्रकरणाला पूर्णविराम दिला. सिद्धांत शिरसाट यांच्या विरोधात अॅड. चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत नोटीस बजावण्यात आली आहे. मानसिक, शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही करण्यात केली होती.