JItendra Awhad: "सनातन धर्माला, मनुवादाला नवीन चेहरा मिळाला"; आव्हाडांची सत्तारांवर बोचरी टीका

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली आहे.
Jitendra Awhad_Abdul Sattar
Jitendra Awhad_Abdul Sattar

मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली आहे. यावरुन राज्यात रणकंदन माजलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तारांना चोवीस तासात माफी मागण्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील सत्तारांवर बोचरी टीका केली आहे. (Sanatana Dharma Manuvad now gets new face of Abdul Sattar says Jitendra Awhad harsh criticism)

आव्हाड म्हणाले, मनुच्या हिंदुत्वासाठी लढणाऱ्या अब्दुल सत्तारांकडून दुसरं काहीही अपेक्षित नव्हतं. मनुने स्त्रियांना समाजात स्थानच नाही असं म्हटलं होत. त्याच मनुवादाचं समर्थन सत्तार करतायेत. सुप्रियाताई यांना भिकार... म्हणणं हे कुठल्या संस्कृतीत बसत याचं उत्तर महाराष्ट्राला त्यांना द्यावंच लागेल.

Jitendra Awhad_Abdul Sattar
Abdul Sattar: शिक्षकांनाही शेतीचं प्रशिक्षण देणार; अब्दुल सत्तारांची घोषणा, पण...

सत्तार ते ज्या मनुवादाच्या नादाला लागले आहेत त्यात ते त्यांचा धर्म विसरले आहेत. कारण इस्लाममध्ये स्त्री जातीला अनन्यसाधारण महत्व आहे. शिव्या तर आम्हांलाही देता येतात. पण सत्तार यांची आई आम्हांला आईसारखी आहे. त्यामुळं त्यांना आया-बहिणीवरून शिव्या देणं हे आमच्या संस्कृतीत बसत नाही, असंही ते म्हणाले.

JItendra Awhad
JItendra Awhad
Jitendra Awhad_Abdul Sattar
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत येण्यास सेलिब्रिटी घाबरतात? फडणवीसांनी दिलं पटोलेंना उत्तर

अब्दुल सत्तार हे मनुवादाचे प्रचारक बनणार आहेत असं खात्रीलायक वृत्त आहे. गेले अनेक वर्षात अत्यंत कट्टर मनुवादी जन्माला आलेला नव्हता. तो अब्दुल सत्तार यांच्या नावाने आता आला आहे. सनातन धर्माला, मनुवादाला आता नवीन चेहरा मिळाला आहे, त्या चेहऱ्याचे नाव आहे अब्दुल सत्तार, अशा शब्दांत आव्हाड यांनी सत्तारांवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com