...त्यानिमित्ताने का होईना बाहेर पडले; आजींवरून देशपांडेंची टीका

राणा दाम्पत्यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनात एक 92 वर्षाच्या आजीने सहभाग घेतला होता.
Sandeep Deshpande
Sandeep DeshpandeGoogle

मुंबई : राणा दाम्पत्यांना हनुमान चालीसा प्रकरणात न्यायालयाने काल चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर शिवसैनिकांनी खार येथील राणा दाम्पत्यांच्या घरासमोर गोंधळ घातला होता. त्यानंतर मुख्यमंत्री आंदोलनात सहभागी झालेल्या एका 92 वर्षाच्या आजीला भेटायला गेले होते. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राणा दाम्पत्यांच्या हनुमान चालीसाच्या इशाऱ्याने मुंबईत दोन दिवस गोंधळ बघायला मिळाला. राणा दाम्पत्यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनात एक 92 वर्षाच्या आजीने सहभाग घेतला होता. त्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या घोषणा दिल्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर काल राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या आजीला भेटायला गेले होते. त्यावर मनसेचे संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलं आहे त्यामध्ये ते म्हणतात की, त्या आजीचा सत्कार केला पाहिजेया यानिमित्ताने का होईना मुख्यमंत्री घराबाहेर पडले असं म्हणत त्यांनी धन्यवाद आजी असं लिहून त्या आजीचे आभार मानत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

दरम्यान मागच्या तीन दिवसांपासून राणा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याच्या इशारा दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या विरोध करत त्यांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनातील 92 वर्षाच्या आजीने लक्ष वेधून घेतलं होतं. दिवसभराच्या गोंधळानंतर राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काल न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब त्या आजीची भेट घेत त्यांचे आभार मानले आहे. आणि तुमच्यामुळेच आम्ही आहोत असं म्हणत त्यांनी त्या आजीला मातोश्रीवर भेटण्यासाठी येण्याचं निमंत्रण दिलं आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com