political news
political newssakal

महाआघाडी विरूद्ध भाजप लढत निश्‍चित; शेतकरी पॅनेल लढवणार 21 जागा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपने स्वतंत्रपणे २१ जागा लढवण्याचा निर्णय आज घेतला. कोअर कमिटीच्या बैठकीत शेतकरी विकास पॅनेलच्या (Farmers Development Panel) माध्यमातून सर्व जागा लढवण्याचे ठरले. तसेच निवडणुकीत विरोधी महाआघाडीच्या पॅनेलला भाजपची ताकद दाखवण्याचा निर्धार करण्यात आला.

Summary

जिल्हा बँकेची चौकशी लागली होती. वास्तविक या चौकशीला सामोरे जाण्याची गरज होती.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना यांनी भाजपला दूर ठेवत महाविकास आघाडी म्हणून लढण्याचे दोन दिवसापूर्वीच्या बैठकीत ठरवले होते. तर भाजपाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता. त्यामुळे आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे लक्ष लागले होते. विजयनगर येथील भाजपाच्या कार्यालयात आज कोअर कमिटीची बैठक झाली. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, राजेंद्रअण्णा देशमुख, दिनकर पाटील, भगवानराव साळुंखे, भाजपचे राज्य सरचिटणीस मकरंद देशपांडे, संग्रामसिंह देशमुख आदी उपस्थित होते. बैठकीत ८० हून अधिक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. जिल्हा बँकेच्या सर्व २१ जागा शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून लढवण्याचे निश्‍चित झाले.

जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी, कॉंग्रेस कोणतीही चर्चा केली नाही. तसेच कोणतीही अपेक्षा ठेवली नव्हती. जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक ताकदीने लढवू शकतो. ८० हून अधिक मुलाखती घेण्यात आल्या आहेत. कोअर कमिटी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करेल. निवडणुकीत भाजप निश्‍चितच विरोधकांना ताकद दाखवून देईल.’’

political news
बेळगावात 'या' 3 कारणांमुळे शाळाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ

माजी आमदार जगताप म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेची चौकशी लागली होती. वास्तविक या चौकशीला सामोरे जाण्याची गरज होती. कारभार स्वच्छ होता तर स्थगिती आणण्याचे कोणतेच कारण नव्हते.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com