Sangli Lok Sabha Election: काँग्रेससने खेळला हुकमी एक्का! लोकसभेची निवडणूक ठरवणार सांगलीची पाटीलकी

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत. आपले आहे ते मतदारसंघ टिकवून ठेवणं आणि नव्या मतदारसंघात मुसंडी मारणं हे मोठं आव्हान पक्षांसमोर आहे.
Sangli Lok Sabha Election
Sangli Lok Sabha Electionesakal
Updated on

Sangli Lok Sabha Election: लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत. आपले आहे ते मतदारसंघ टिकवून ठेवणं आणि नव्या मतदारसंघात मुसंडी मारणं हे मोठं आव्हान पक्षांसमोर आहे. या सगळ्यात सांगली लोकसभा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आणि यंदाही ही निवडणूक  २ पाटलांमुळे गुंतागुंतीची पण रंगतदार ठरणार आहे. सांगलीचं राजकारण नेमकं काय? भाजप आपली जागा कायम ठेवणार की काँग्रेस मुसंडी मारणार? हे समजून घेऊया. (What exactly is the politics of Sangli?)

तर सगळ्यात आधी जाणून घेऊ सांगलीतलं राजकारण. सांगली लोकसभा (Sangli politics) एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला.  म्हणजे १९६२ ते २००९ म्हणजे जवळपास ५२ वर्ष या ठिकाणाहून काँग्रेसचा खासदार केंद्रात जायचा. पण २०१४ च्या मोदी लाटेत भाजपने ही जागा मारली आणि काँग्रेसचा गड फोडला.  

२०१४ चा सामना हा भाजपच्या संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) आणि काँग्रेसचा प्रतिक बापु पाटलांमध्ये (Pratik Bapu Patil) होता. संजय काका पाटील हे राष्ट्रवादी सोडून लोकसभा निवडणूकांच्या अगदी महिनाभर आधी भाजपमध्ये आले होते. पक्ष प्रवेश होताच त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. आणि ते खासदार म्हणून निवडून आले.

संजय काका पाटील (Sanjay Kaka Patil) निवडून येण्यामागे मोदी लाट असल्याची चर्चा होती. तर असही बोललं जात की, सांगलीतल्या मतदारांना विकास हवा होता. काँग्रेसच्या कारभारात जिल्ह्याचा विकास झाला नाही, अशी चर्चा होती. त्यामुळे तिथल्या जनतेनं भाजपला संधी दिली.

त्यानंतर २०१९ च्या लोकसभेत प्रतिक पाटील निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले.  आता यावेळी विशाल पाटलांसारखा (Vishal Patil) तरुण आणि आक्रमक चेहरा समोर आला. विशाल पाटलांना माननारा वर्ग देखील मोठा आहे. त्यामुळे काँग्रेससाठी ही मोठी संधी होती. पण ऐनवेळी सांगलीची जागा काँग्रेसनं स्वाभिमानी पक्षासाठी सोडली. त्यामुळे विशाल पाटलांना स्वाभिमानीच्या नावावर निवडणूक लढवाली लागली आणि काँग्रेसनं त्यांना पाठींबा दिला. पण यावेळी वंचितने गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना संधी दिली.  वंचित आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) वेगवेगळी लढल्याने त्याचा फायदा भाजपाला झाल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसचे असलेले परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Sanghatana) लढलेल्या विशाल पाटील (Vishal Patil) यांनी 3 लाख 44 हजार 643 तर गोपीचंद पडळकरांनी 3 लाख 234 मते मिळवली होती. भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी 5 लाख 8 हजार 995 मते मिळवत दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) जिंकली.

त्यामुळे यंदाचीही निवडणूक गेल्या वर्षीप्रमाणे तिहेरी होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.  नुकताच सांगलीत पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभा मतदार संघ (Sangli Lok Sabha Constituency) काँग्रेसकडेच राहणार असून या ठिकाणी उमेदवार म्हणून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Congress State Vice President Vishal Patil) निवडणूक लढवतील असे सांगण्यात आलं. काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: ही माहिती दिली.

तसं पाहिलं तर या ठिकाणी भाजपचं पारडं जड राहणार आहे. कारण गेल्या दोन्ही टर्म संजय काका पाटलांनी मोठ्या फरकाने आपल्या विरोधी उमेदवाराचा फडशा पाडलाय. पण यंदाच्या निवडणुकीत संजय काका पाटल्यांच्या नावाला भाजपतून अंतर्गत विरोध आहे. पक्षाचे विलास जगताप, पृथ्वीराज देशमुख (Prithviraj Deshmukh) सुरेश लाड, सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) यांसारख्या नेत्यांनी संजय काका पाटलांच्या नावाला विरोध केला आहे.

Sangli Lok Sabha Election
Sharad Pawar: आगामी निवडणूक लढवण्याबाबत शरद पवारांचा मोठा निर्णय! म्हणाले, 'मी...'

तसं पाहिलं तर हा विरोध याआधी २०१९ च्या निवडणूकीवेळीही होता. पण भाजपकडे त्यावेळी दुसरा कुठला चांगला उमेदवार नव्हता. त्यामुळे  फडणवीसांनी या सगळयांची समजूत काढली आणि संजय काकांना पुन्हा उमेदवारी दिली होती. आता पुन्हा विरोध होत असला तरी भाजपकडे यंदाही संजय काकांसारखा दुसरा कोणता तगडा उमेदवार नाही. तशी चर्चा पृथ्वीराज देशमुखांच्या नावाचीही आहे. पण पृथ्वीराज देशमुखांऐवजी संजय काकांच पारडं कधीही जड राहणार आहे.  

या सगळ्यात अशीही चर्चा सुरु आहे की, भाजप विशाल पाटलांना आपल्या बाजूने घेईल. म्हणजे विशाल पाटलांचा (Vishal Patil) भाजप (BJP) प्रवेश. कारण सांगलीच्या राजकारणात विशाल पाटलांचा दबदबा आहे. पण विशाल पाटलांना खासदारकीपेक्षा आमदार होण्याची इच्छा असल्याचं बोललं जातं. स्थानिक पातळीवर त्यांची पकड चांगलीच आहे. त्यामुळे विशाल पाटील लोकसभेला उभे राहतील का? असा सवाल आधी उभा राहतो. (Will Vishal Patil stand for Lok Sabha?)

आणि जर विशाल पाटील (Vishal Patil) काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिले तर भाजपला संजय काका पाटलांशिवाय चांगला पर्याय नाही. राहिला प्रश्न तिहेरी निवडणुकीचा तर गेल्यावेळी वंचितकडून गोपीचंद पडळकरांना (Gopichand Padalkar) उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनाही चांगली मत पडली होती. पण आता पडळकर भाजपसोबत असल्याने वंचितकडून डबल महाराष्ट्र केसरी राहिलेल्या चंद्रहार पाटलांच्या (Chandrahar Patil) नावाची चर्चा आहे. आणि गेल्या निवडणूकांचा अनुभाव पाहता तिसऱ्या उमेदवारा फायदा हा कायम भाजपला झाला आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक सोप्यात ठरणार आहे. पण संजय काकांना होत असलेल्या अंतर्गत विरोधामुळे भाजपमध्ये धाकधुक सुरु आहे.

राहिला प्रश्न विशाल पाटलांचा (Vishal Patil) तर विशाल पाटलांची निवडून येण्याची चिन्ह जास्त आहेत. पण यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटलांचा (Jayant Patil of NCP) रोल जास्त महत्वाच आहे. कारण गेल्या निवडणुकीवेळी अशी ओरड होती की, विशाल पाटलांनी संजय काका पाटलांना टफ फाईट दिली होती ते निवडूनही आले असते पण जयंत पाटलांनी म्हणावा तसा पाठिंबा दिला नाही. आता याला कारण जयंत पाटील (Jayant Patil) आणि विशाल पाटील यांच्या कुंटुंबाचा जूना वादही असल्याच बोललं जात. संजय काका पाटील आणि जयंत पाटलांचे चांगले संबंधही आहेत. याचा फटका विशाल पाटलांना बसलाय आणि याही निवडणुकीत बसू शकतो. पण हे विसरून चालणार नाही की विशाल पाटलांच्या सगळ्या सभांना जयंत पाटलांचा हजेरी ही होतीच. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला नाही असं म्हणता येणार नाही.  त्यामुळे यंदाही सगळं आलबेल राहिलं तर विशाल पाटीलही बाजी मारू शकतात.

यालाच एक कारण विकासाचही आहे. कारण विद्यमान खासदारांवर सांगलीकर जरा नाराज असल्याचं बोललं जातंय. कारण सांगलीतील 'ड्रायपोर्ट' होणार अशी चर्चा चर्चाच राहिली, त्यात विमानतळासाठीही पाठपुरवठा काही झाला नाही, आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे हळद संशोधन केंद्र. हळद ही सांगलीची ओळख पण असं असुनही हे केंद्र हिंगोलीला गेलं. आणि हे एकप्रकारे केंद्रात पक्षाची सत्ता असूनही विद्यमान खासदारांचे अपयश मानले जाते. (Latest Marathi News)

पण शेवटी जनता जनार्दन आहे. आणि निकाल जनता ठरवणार पण एकंदरीत सांगलीच्या या गुंतागुंतीच्या राजकारणात निवडणूक मात्र रंगतदार ठरणार हे नक्की. (Sangli Political History)

Sangli Lok Sabha Election
Sharad Pawar: "देशाच्या बाहेरील व्यक्ती PM मोदींच्या विरोधात बोलत असेल तर..."; भारत-मालदीव वादात शरद पवारांची ठोस भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com