
महाभारतातील कुंती पुत्र कर्ण इतरांपेक्षा वेगळा होता. कारण, जन्मताच त्याच्या शरीरावर सुवर्ण कवच अन् कानात सोन्याची कुंडले होती. म्हणून महाभारतातील इतर सर्वांपेक्षा तो वेगळा होता. त्याच्या कानात असलेली कुंडल त्याला विषेश बनवतात. तसंच महाराष्ट्रात असलेलं एक गाव वेगळं आहे. कारण, या गावाच्या सुवर्णभुमीत असलेलं एक कुस्तीच मैदान.
तुमच्या लक्षात आलंच असेल की मी नक्की कोणत्या गावाबद्दल बोलते आहे. सांगलीतल्या पलूस तालुक्यात असलेलं कुंडल हे गाव इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरावं असंच आहे. या गावाने प्रतिसरकारची केलेली पायाभरणी अन् इथं असलेलं ‘महाराष्ट्र कुस्ती मैदान’ हे खास आहे. येत्या रविवारी म्हणजे ९ फेब्रुवारी रोजी पुन्हा या मैदानावर शड्डू घुमणार आहे. त्याची सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. त्यानिमित्तानेच या मैदानाचा घेतलेला आढावा.