सैनिकांच्या गावात देशभक्ती नसानसात 

संताजी भोसले
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

रांजणी - कवठेमहांकाळ तालुक्‍यातील रांजणी देशभक्ती, देशप्रेमाणे भारलेले गाव "सैनिकांचे गाव' म्हणून सर्वदूर ख्याती आहे. या मातीत जन्मलेल्या व भारतीय सेनेत जवान बनलेल्यांच्या नसानसात देशभक्ती भिनली आहे. देशसेवा, ऊर्मी, प्रेरणा, ठासून भरली आहे. डॉक्‍टर, शिक्षक बनण्यापेक्षा मुलगा सैनिक, लष्करात मोठा अधिकारी व्हावा एवढीच लोकांची अपेक्षा असते. 

रांजणी - कवठेमहांकाळ तालुक्‍यातील रांजणी देशभक्ती, देशप्रेमाणे भारलेले गाव "सैनिकांचे गाव' म्हणून सर्वदूर ख्याती आहे. या मातीत जन्मलेल्या व भारतीय सेनेत जवान बनलेल्यांच्या नसानसात देशभक्ती भिनली आहे. देशसेवा, ऊर्मी, प्रेरणा, ठासून भरली आहे. डॉक्‍टर, शिक्षक बनण्यापेक्षा मुलगा सैनिक, लष्करात मोठा अधिकारी व्हावा एवढीच लोकांची अपेक्षा असते. 

""मर्द आम्ही मराठे खरे 
दुष्मनाला भरे कापरे, 
देश रक्षावया, धर्म तारावया. 
कोण झुंझात मागे सरे, 
मर्द आम्ही मराठे खरे'' 

रांजणी या कवठेमहांकाळ तालुक्‍यातील छोट्या गावातील तरुणांच्या तोडूंन ही वाक्‍ये सतत ऐकायला मिळतात. इथक्‍या जवानांनी देशाच्या इतिहासात गावचे नाव सुवर्णक्षरांनी कोरले आहे. रांजणीत एक हजार चारशे पेक्षा जास्त सैनिक आहेत, तर तीनशे पन्नासहून जवान देशसेवा करीत आहेत. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक सैनिक याच गावातील आहेत. जिल्ह्याच्या पूर्वभागात कवठेमहांकाळ पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले छोटे गाव जवळजवळ दहा हजार लोकवस्ती गाव आहे. गावाला "सैनिकीची छावणी' म्हणतात. या गावची प्रेरणा घेऊन अग्रण धुळगाव, लोणारवाडी, अलकुड(एस) व परिसरातील तरुण ही सैन्यात दाखल झाले आहेत आणि आजही दाखल होत आहेत. या गावातील पाच हजारांवर जवानांनी देशरक्षणांची पताका हाती घेतली आहे. 

रांजणीत पूर्वीपासून सैन्यदलात भरतीची परंपरा आहे. तरुणांना सैनिकाचा गणवेश आणि वर्दीचे आकर्षण व वेडच आहे म्हणा. कुटुंबातील एकतरी तरुण सैन्यात आहेच. पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा आणि नातू अशा पिढ्यांची परंपराच तयार आहे. नव्हे ही या गावची संस्कृतीच बनली आहे. 

ब्रिटीश काळापासून रांजणीवर तरुण मोठ्या संख्येने सैन्यात जाऊ लागले. 

पहिल्या महायुद्धात रांजणीचे चार जवान शहीद झाले. त्यामध्ये बळवंत यशवंत भोसले, गणपती ज्ञानू भोसले, पितांबर तात्या देसाई, राजाराम बाबाजी सूर्यवंशी यांचा समावेश होतो. दुसऱ्या महायुद्धात ज्ञानेश्‍वर रामचंद्र भोसले, भगवान आण्णाप्पा भोसले, शंकर ज्ञानू भोसले, लक्ष्मण माने, रामराव भोसले, तुकाराम कृष्णा पवार, सखाराम सोनुर, बापू पवार, वसंत बंडा भोसले, सखाराम चव्हाण, सखाराम पवार, निवृत्ती पवार तर 1971 मध्ये इंडो-पाक युद्धात विलास पांडुरंग साळुंखे यांना वीरगती प्राप्त झाली. 

पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या बळवंत यशवंत भोसले यांच्या वडिलोपार्जित शेतातच समाधी आहे. त्याचीच प्रेरणा घेऊन आबासाहेब अण्णासाहेब भोसले सैन्यात दाखल झाले. शिपाई ते ऑनररी कॅप्टन पर्यंत मजल मारली. कुटुंबातील नातेवाईकांना व भावांना सैन्यात दाखल होण्यास प्रवृत्त केले. त्यांनी विविध युद्धात 1961, 1962, 1965 मध्ये हिरीरिने भाग घेतला होता. गोवा मुक्ती लढ्यात ही सहभाग होता. त्यांच्या मुलांनी सहभाग घेतला होता. कृष्णराव भाऊराव भोसले, पांडुरंग आबासाहेब भोसले, शांताराम बळवंतराव भोसले, यांना लष्कराने विविध पदकांनी सन्मानित केले होते. 

रांजणीने भारतीय लष्कराला शेकडो नाईक, सुभेदार, हवालदार, लेफ्टनंट, कॅप्टन, कर्नल असे अधिकारी दिले. संपतराव साळुंखे "कर्नल' पदापर्यंत पोहोचले. सध्या सतीश चंद्रसेन भोसले "मेजर' आहेत. 

दिवगंत पतंगराव भीमराव भोसले यांनी 30-12-1993 रोजी सैनिक, जवान, विधवा महिला यांच्यासाठी गावात माजी सैनिक पतसंस्था स्थापन केली आहे. कोटयवधीची उलाढाल आहे. तर ऑनररी सुभेदार मेजर (निवृत्त) गणपती शाबाजी सुखदरे यांनी "माजी सैनिक कल्याण संघटना' स्थापन केली. 

विजय यमगर यांचा बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार केल्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक देऊन सन्मान करण्यात आला आहे.

Web Title: sangli news ranjani solider 71st Independence Day