esakal | #SaathChal धावा विठ्ठलाचा अन्‌ विसावा पंढरीचा 
sakal

बोलून बातमी शोधा

#SaathChal  धावा विठ्ठलाचा अन्‌ विसावा पंढरीचा 

तुका म्हणे धावा, पंढरी आहे विसावा, संत तुकोबारायांच्या अभंगातील आत्मिक ओढ सोहळ्यातील आज तोंडले बोंडलेच्या उतारावर झालेल्या धाव्यात दिसून आली. धावा असल्याने सकाळपासून वारकऱ्यांना त्याचे आकर्षण होते.

#SaathChal धावा विठ्ठलाचा अन्‌ विसावा पंढरीचा 

sakal_logo
By
सचिन शिंदे

पिराची कुरोली -  तुका म्हणे धावा, पंढरी आहे विसावा, संत तुकोबारायांच्या अभंगातील आत्मिक ओढ सोहळ्यातील आज तोंडले बोंडलेच्या उतारावर झालेल्या धाव्यात दिसून आली. धावा असल्याने सकाळपासून वारकऱ्यांना त्याचे आकर्षण होते. पंढरी समीप आल्याची जाणीव धाव्यातून होत असते. धावा विठ्ठलाचा अन्‌ विसावा पंढरीचा असल्याने मन आनंदी झाले. त्या आनंदात जीवनातील सारे सुख सामावली आहेत, अशी भावना धाव्यात सहभागी झालेल्या वाघोली (जि. पुणे) येथील दिंडीतील युवा वारकरी सचिन आवटे याने व्यक्त केले. त्याची चौथी वारी आहे. वारीतील आनंद जीवनालाही दिशा दाखवते, असेही तो म्हणाला. 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बोरगावहून सकाळी लवकर मार्गस्थ झाला. सोहळ्यात आज महत्त्वाचा धावा होता. त्यासाठी वारकरी तयार होते. तो धावा पाहण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. तोंडल्याच्या उतावरवर धावा होता. त्याची माहिती असल्याने अनेक जण आले होते. संत तुकोबारायांच्या धावा, संत सोपानकाका व माउलींची बंधूभेट असे सोहळे असल्याने राज्यभरातील लोक जमा झाले होते. तोंडले बोंडल्याच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. संत तुकाराम महाराज यांचा सोहळा तोंडल्याच्या उतारावर आला. चोपदारांनी तुका म्हणे, धावा पंढरी आहे विसावा, असा अभंग म्हणताच वारकरी पंढरीच्या ओढीने धावले. पंढरी समीप आल्याची ती आत्मिक ओढ वारकऱ्यांमध्ये दिसून आली. त्यात वाघोलीचा सचिन आवटेही धावला होता. अत्यंत आनंदात त्याने तेथे नाचही केला. त्याच्याशी संवाद साधला. सचिन म्हणाला, ""वारीतील गोल रिंगण, उभे रिंगण, धावा, आरती अभंग, समाज आरती अशा अनेक प्रथा आहेत. त्या प्रथा आनंद देणाऱ्या आहेत. पंढरीचा आत्मिक ओढ अधिक दृढ असा पंरपरा अनेक अर्थाने जीवनातही सुख आणतात. वारीत त्याचा आनंद द्विगुणित होतोच. त्याशिवाय तो आनंद जीवनातही आणता येतो. लोक सुखी झाली पाहिजे, अशी शिकवण वारी देते. त्याचे आचरण प्रत्येक वारकऱ्याने केले पाहिजे.'' 

तुका म्हणे धावा, पंढरी आहे विसावा... अशी आर्त हाक देत वारकरी पंढरीची आस घेऊन धावतात. ती भक्तीची आस प्रत्येक वारकऱ्यांत सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी आहे. तीच ऊर्जा तुमच्या आयुष्यातही तितकीच महत्त्वाची ठरते.  
सचिन आवटे,  युवा वारकरी  वाघोली (जि. पुणे) 

loading image