राष्ट्रपती पदासाठी उमेदवार कसा असावा? राऊतांचा भाजपला सल्ला, म्हणाले.. | Sanjay Raut Advice To BJP over President Candidate | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut Advice To BJP over President Candidate

'शिवसेनेच्या हिंदुत्वावर विरोधकांना प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही'

राष्ट्रपती पदासाठी उमेदवार कसा असावा? राऊतांचा भाजपला सल्ला

भाजपचे हिंदुत्व नकली आहे. भाजपाने राजकीय सोयीसाठी भूमिका बदलल्या आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वावर भाजपला पोटदुखी आहे. सेनेच्या हिंदुत्वावर विरोधकांकडून सातत्याने टीका सुरु असते. मात्र शिवसेनेने कधीही हिंदुत्वाची भूमिका बदलेली नाहीत. त्यामुळे सेनेच्या हिंदुत्वावर विरोधकांना प्रमाणपत्र देण्याची गरज नाही अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आज ते अयोध्येतून बोलत होते. (Sanjay Raut News)

हेही वाचा: मिशन विधान परिषद, मुख्यमंत्री ठाकरेंनी वर्षावर बोलवली बैठक

शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यावरून विरोधकांनी टीकेचे झोड उठवली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना राऊतांनी भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले, आमच्या हिंदुत्वावर विरोधकांना प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. विरोधकांनी देशाला मान्य होईल असा उमेदवार राष्ट्रपती पदासाठी द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. शिवसेनेची भूमिका देशाला उत्तम नेतृत्व मिळावे इतकीच असते. मख्यमंत्री ठाकरे कधीही खालच्या पातळीचं राजकारण करत असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.(Sanjay Raut Advice To BJP over President Candidate)

पुढे नबाव मलिक यांच्यासंदर्भात विचारले असता राऊत म्हणाले, मलिक यांना अन्याय करुन अटक केली आहे. त्यामुळे त्याचं मंत्रिपद काढून घेऊन त्यांच्यावर आणखी अन्याय होऊ नये या मताचे आम्ही आहोत. आम आदमी पार्टीचे सत्येंद्र जैन यांनाही अशी पद्धतीने अडकवण्यात आले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन देशातील अनेक बड्या नेत्यांना अडकण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. मात्र या दडपशाहीसमोर झुकायंच नाही असा चंग नेत्यांनी बांधला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: ठाकूर रातोरात न्यू यॉर्कला रवाना, आघाडीसह भाजपचं टेन्शन वाढवलं!

राहुल गांधी यांची मागील तीन दिवसांत तीस तास चौकशी सुरु आहे. यासंदर्भात विचाले असता राऊत म्हणाले की, हे दवाबाचं राजकारण आहे. राष्ट्रपती पदासाठी नियुक्ती सुरु असून यामध्ये विरोधकांनी कोणतीही राजकीय भूमिका घेऊ नये यासाठी हे दबावतंत्र सुरु आहे. २०२४ साठी ही तयारी सुरु आहे, असंही ते म्हणाले आहेत. विधान परिषदेसाठी आमदारांना हॉटेलवरच ठेवणार कारण दुसरीकडे कुठे जागा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्याकडे दोन उमेदवार निवडुण आणण्याची क्षमता आहे, आम्ही ते निवडूण आणू असंही राऊत म्हणाले.

Web Title: Sanjay Raut Advice To Bjp For Election Of Presidential Person Chooed As Accepted By Indian

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top