"माझी मान कापली तरी मी ठाकरेंशी एकनिष्ठ"; सुनील राऊतांचं स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil Raut

"माझी मान कापली तरी मी ठाकरेंशी एकनिष्ठ"; सुनील राऊतांचं स्पष्टीकरण

Eknath Shinde: संजय राऊत (Sanjay Raut) यांचे सख्खे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut) हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर आपल्याला मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे ते शिंदे गटात जाण्यासाठी गुवाहटीला रवाना होणार असल्याच्या चर्चा होत होत्या पण या चर्चानंतर सुनील राऊत यांनी आपल्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

(Sunil Raut On Eknath Shinde Politics)

हेही वाचा: शिंदे गट मनसे सोबत जाणार? केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

"मी बाळासाहेबांचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे, माझी मान कापली तरी मी ठाकरेंशी एकनिष्ठ राहील." असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं असून आपण शिंदे गटात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान ज्या बंडखोरांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे त्यांची आम्ही काय हार घालून आरती करायची का? त्यांना चांगलेच प्रत्युत्तर मिळणार आहे. ज्या पक्षाच्या नावावर जिंकून गेले ते आल्यावर त्यांच्यासाठी आम्ही काय फटाके वाजवू का? असा टोकाचा इशारा सुनील राऊत यांनी दिला आहे.

हेही वाचा: "शिवसेना वाचवण्यासाठी मरण आलं तरी बेहत्तर"; शिंदेंच राऊतांना प्रत्युत्तर

दरम्यान यावर संजय राऊत यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, "माझे कुटुंब मेले तरी चालेल पण शिवसेनेशी बेईमानी करणार नाही." असं वक्तव्य संजय राऊतांनी यावर स्पष्टीकरण देताना केले आहे. सुनिल राऊत हे सध्या कांजूरमार्ग येथे सभा घेत असल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला असून सुनील राऊत हे शिंदे गटाला मिळण्यासाठी नाही तर शिवसेनेतच राहणार असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे आपल्यासोबत ३९ आमदार घेऊन गुवाहटीला गेले असून त्यांच्या या बंडामुळे शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकार धोक्यात आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि शिवसेनेतील वाद टोकाला पोहोचला आहे. दरम्यान शिंदे यांनी ट्वीट करत शिवसेनेला टीकेचं प्रत्युत्तर दिले आहे.

Web Title: Sanjay Raut Brother Sunil Raut Eknath Shinde Politics Shivsena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..