
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि कोकणातील आमदार भास्कर जाधव हे पक्ष सोडून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करण्याच्या चर्चा या अफवा असल्याचे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. जाधव यांच्या कुटुंबात लग्न असल्याने ते पक्षाच्या बैठकीला हजर राहणार नसल्याचे त्यांनी कळविल्याचे राऊत यांनी सांगितले.