Sanjay Raut PC : महाराष्ट्रासह दोन राज्यांचे सरकार पाडण्याचे षडयंत्र; संजय राऊतांचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut
Sanjay Raut PC : महाराष्ट्रासह दोन राज्यांचे सरकार पाडण्याचे षडयंत्र; संजय राऊतांचा आरोप

महाराष्ट्रासह दोन राज्यांचे सरकार पाडण्याचे षडयंत्र; संजय राऊतांचा आरोप

राज्य सरकारला अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सातत्यानं भाजपकडून केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. आपण ईडी (ED) किंवा केंद्रीय तपास यंत्रणांना घाबरणार नाही असं स्पष्ट संजय राऊत यांनी सांगितलं. आज त्यांनी शिवसेना भवनाबाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक आरोप केले. यावेळी तीन राज्यातील सरकार पाडण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचंही ते म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, मला गोळी मारा, जेलमध्ये टाका. काहीही करा मी घाबरणार नाही. तुम्हाला जे करायचं ते करा. मी जे तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. महाराष्ट्रासोबत बंगाल आणि झारखंडचं सरकार पाडण्याचं षडयंत्र असल्याचंही राऊतांनी म्हटलं.

हेही वाचा: Sanjay Raut: राऊतांना फडणवीसांचे पाच शब्दांत उत्तर

भाजपकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, आमचे लोक तयार आहेत. हे लोक धमक्या देतील, घाबरवतील पण तुम्ही आमचा डीएनए पाहिला नाही असं राऊतांनी यावेळी सुनावलं. तसंच असा तुरुंग अजून बनला नाही की जो आम्हाला दोन वर्षे तुरुंगात ठेवू शकेल असेही राऊतांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांना माझं बोलणं ऐका आणि ते ऐकावंच लागेल असंही म्हटलं. ते म्हणाले की, ईडी वाले सुनो, माझं बोलणं आज ऐकावं लागेल. तसंच ईडी, सीबीआय यांच्यासह पंतप्रधान आणि गृहमंत्री आज माझं बोलणं ऐकतायत हे मला माहितीय असे राऊतांनी म्हटले.

Web Title: Sanjay Raut Conference Government Collapse Planning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top