Sanjay Raut I 'कायदा सुव्यवस्था धोक्यात, केंद्रात जाण्याआधी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

मुंबई पोलिस खोट्या गुन्ह्यात अडकवत नाहीत, राऊतांचं स्पष्टीकरण

'कायदा सुव्यवस्था धोक्यात, केंद्रात जाण्याआधी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं'

एका खोटारडा माणूस दुसऱ्या आरोपीला भेटायला जातो हे जनतेला मान्य नाही, त्यामुळे भाजपाच्या किरीट सोमय्यांवर हा हल्ला झाला असावा. मुंबई पोलिस चुकीची कारवाई करत नाहीत. काही चूक असेल म्हणूनच पोलिसांनी कारवाई केली आहे. मुंबई पोलिस खोट्या गुन्ह्यात अडकवत नाहीत, अस स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आज ते मुंबईत बोलत होते. केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाबाबत आम्ही तुम्हाला विचारतो का? असा उलट सवालही राऊतांनी भाजपला केला आहे. झेड प्लस सुरक्षा हासुद्धा एक घोटाळा आहे. केंद्र ज्या लोकांना झेड प्लस, वाय सुरक्षा देते त्यातही घोटाळा सुरु आहे. त्यामुळं केंद्रात जाण्याआधी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं, असा सल्लाही राऊतांनी दिला आहे.

भाजपाचे किरीट सोमय्या यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत. काल झालेला हल्ल्यात ठाकरे सरकार स्पॉंन्सर असल्याचे ते म्हणाले आहेत. यावर राऊतांनी प्रतित्त्युर दिले आहे. ते म्हणाले, लोकांच्या मनात आयएनएस विक्रांत घोटाळ्यासंदर्भात संताप आणि रोष आहे. लोकांकडून आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली पैसा गोळा केले गेलेत. अशा व्यक्तीच्या विरोधात जनतेनं रस्त्यावर उतरून दोन दगडं मारली तर भाजपने चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्राची जनता अशा गुन्हेगारांना माफ करणार नाही. ते म्हणाले, युवक प्रतिष्ठानचे अकाउंट चेक करा. त्यांचे दाते कोण आहेत, पैसे कुणी दिलेत आणि त्या दात्यांवर ईडीची कारवाई सुरु आहे का? त्यांच्याकडून किरीट सोमय्यांच्या ट्रस्टने धमक्या देऊन लाखो रुपये घेतले आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले, झेड प्लस सुरक्षा हासुद्धा एक घोटाळा आहे. केंद्र ज्या लोकांना झेड प्लस, वाय सुरक्षा देतेय त्यातही घोटाळा सुरु झाला आहे. ममतांविरोधात, महाराष्ट्र, झारखंड, केरळमध्ये जे विरोधात बोलतात त्यांना सुरक्षा दिली जाते. हा एक सुरक्षा घोटाळाच आहे असंही राऊतांनी म्हटलंय.

Web Title: Sanjay Raut Criticism On Somaiya Attack Says Devendra Fadnavis Soon Meet With Cm Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top