मुंबई - ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपबरोबर जाणार नाहीत. पण त्यांच्या पक्षातील काही नेत्यांचे कारखाने, सूतगिरण्या असल्याने त्यांना सत्तेची नक्कीच तहान लागली असेल. मात्र तहान लागल्यावर कोणी गटारातील किंवा गढूळ पाणी पीत नाही,’ अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.