Sanjay Raut on Loudspeaker Controversy
Sanjay Raut on Loudspeaker Controversye sakal

'भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचा...', राज यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांचं ट्विट

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आज पत्रकार परिषद घेऊन मशिदीवरील भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं. राज ठाकरेंची पत्रकार परिषद संपताच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करून ठाकरेंना टोला लगावला आहे. भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा गळा घोटला, असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut on Loudspeaker Controversy
Hanuman Chalisa Row : 'धार्मिक रंग दिला तर...', राज ठाकरेंचा सरकारला इशारा

भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा सुद्धा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक तिर्थस्थनावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांनुवर्ष भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते. मग त्यावरही बंदी आणणार का? असं संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी दिलेला अल्टीमेटम ३ मे रोजी संपला होता. पण, ३ मे रोजी ईद असल्यानं कुठलंही आंदोलन न करण्याच्या सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. पण, काल त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी सज्ज राहा, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरेंचे आदेश प्राप्त होताच आज मनसे कार्यकर्त्यांनी पहाटेपासून मशिदीसमोर ठिय्या मांडला होता. अनेक मशिदींसमोर भोंग्यांवरून हनुमान चालिसा वाजविण्यात आली. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी इमारतींवर चढून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवली. वातावरण अधिक बिघडू नये यासाठी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. अनेक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले.

कार्यकर्त्यांची धरपकड होताच राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. आम्ही कायद्यानुसार चालत असताना आमच्यावर कारवाई का केली जाते? कायद्याचं पालन न करणाऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार का? असे सवाल त्यांनी सरकारला विचारले. तसेच भोंग्यासाठी फक्त आज आंदोलन केलं नाहीतर हे आंदोलन पुढेही सुरूच राहणार. आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवणार, अशी ठाम भूमिका राज ठाकरेंनी मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com