esakal | अभ्यास केला असता तर सावरकरांबद्दल बाष्कळ विधान केलं नसतं: संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

अभ्यास केला असता तर सावरकरांबद्दल बाष्कळ विधान केलं नसतं: संजय राऊत

sakal_logo
By
सुधीर काकडे

शिवसेना नेते संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून भाजपला धारेवर धरण्याचा एकही संधी सोडताना दिसत नसल्याचं दिसून येतंय. त्यातच शिवसेवना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. देशाचे संरक्षण मंत्री आणि भाजपनेते राजनाथ सिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकारंनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून ब्रिटीशांना दया याचिका लिहील्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर आता संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

हिंदुत्वाची मांडणी करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्याच सूचनेवरून अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, असं वादग्रस्त वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरून वादंग पेटल्याचं दिसतंय. यावर बोलताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य असल्याचं म्हणत त्यांनी जर अभ्यास केला असता तर सावरकरांबद्दल असं वक्तव्य केलं नसतं अस विधान यावेळी संजय राऊत यांनी केलंय. स्वातंत्र्यवीर सावकर देशातील स्वातंत्र्य वीरांचे मुकूटमणी आहेत, मात्र भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी सावकरांची बदनामी केल्याचा आरोप यावेळी संजय राऊत यांनी केला. तसंच जर त्यांनी अभ्यास केला असता तर असं वक्तव्य केलं नसता अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान, दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या दसरामेळाव्याकडे राज्यातील तसंच देशातील राजकारण्यांच आणि सर्वसामान्यांचं लक्ष लागून असतं. यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली असताना शिवसेनेचा हा दसरा मेळावा नेमका कसा साजरा करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

loading image
go to top