Sanjay Raut: संजय राऊत आहेत तरी कुठे? सलग दोन दिवस सकाळच्या पत्रकार परिषदेला मारली दांडी

गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत माध्यमांपासून दुर आहेत.
Sanjay Raut
Sanjay Raut

गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत माध्यमांपासून दुर आहेत. रोज संवाद साधणार राऊत दोन दिवस झाले तरी माध्यमांसमोर आले नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे. संजय राऊत कुठं आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे. (Sanjay raut did not come infront of the media Where is Raut After the criticism of Sharad Pawar And NCP )

सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य करत 'वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले.' अशी टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली.

पण नेहमी प्रत्येकाच्या टीकेला, आरोपला प्रत्युत्तर देणार संजय राऊत माध्यमांसमोर दिसले नाहीत. त्यामुळे राजकीय गोटात संजय राऊत गेले कुठे? नॉट रिचेबल आहेत का? असे अनेक प्रश्न जनतेला पडत आहेत. तर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

Sanjay Raut
Sharad Pawar : शरद पवारांच्या निर्णयानंतर ठाकरेंचा गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यामुळे अडचणीत येतात असा आरोप अनेकवेळा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. संजय राऊत 'सामना'चे कार्यकारी संपादक म्हणून आणि शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार म्हणून काम कायम चर्चेत असतात. राऊत 'महाविकास आघाडी'च्या शिल्पकारांपैकी मानले जातात.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते आत्तापर्यत संजय राऊत रोज माध्यमांसमोर येत झालेल्या घटनेवर परखड मत व्यक्त करत असतात. मात्र, त्यांच्या वक्तव्यामुळं ठाकरे सध्या अडचणीत येत असल्याचा तर्क अनेक राजकीय पंडीत लावत आहेत. पण गेले दोन दिवस झालं संजय राऊत माध्यमांसमोर न आल्याने राजकीय पंडीतांच्या वर्तुळात खळबळ माजली आहे.

Sanjay Raut
Raut Vs NCP: 'हा आमचा घरातला प्रश्न...', शरद पवार यांच राऊतांना थेट उत्तर

भुजबळांनी दिलाय मविआतून बाहेर पडण्याचा इशारा

पवार यांच्यावरील टीकेनंतर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मविआतून बाहेर पडण्याचा इशारा अप्रत्यक्षपण दिला. 'शरद पवार साहेबांनी लोक माझे सांगाती पुस्तकात जे म्हणले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. मग संजय राऊत यांना काय अडचण आहे? संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे ? असे सवाल उपस्थित केले.

Sanjay Raut
Raut Vs NCP: राऊतांमुळे ठाकरे अडचणीत? NCP च्या ज्येष्ठ नेत्याने दिला मविआतून बाहेर पडण्याचा इशारा

तसेच, राऊत यांना असे वाटते का, की राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे. मतभेध निर्माण व्हावेत. तुमचं जेवढ आयुष्य आहे तेवढं शरद पवार साहेबांचा राजकारण आहे. ते कुणाच्या घरात गेले होते त्यांनाच माहिती इतकं लक्ष त्यानी शिंदे ग्रुप आणि त्यांच्या बॅगवर ठेवले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. अशी कोपरखळीदेखील भुजबळ यांनी राऊतांना मारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com