Sanjay Raut : तुरूंगात मलाही मारण्याचा प्रयत्न झाला होता; राऊतांचा खळबळजनक खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

Sanjay Raut : तुरूंगात मलाही मारण्याचा प्रयत्न झाला होता; राऊतांचा खळबळजनक खुलासा

Sanjay Raut : तुरूंगात असताना मलाही मारण्याचा प्रयत्न झाला होता असा धक्कादायक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केा आहे. ते रत्नागिरीत माध्यमांशी बोलत आहेत.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

मात्र, यावर आपण योग्यवेळ आल्यानंतर बोलू असे म्हणत राऊत म्हणाले की, राज्यात आणीबाणीपेक्षा वाईट परिस्थीती असून, लोकशाहीचे मुखवटे लावून देशात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राऊत म्हणाले.

पत्रकार वारिसेंच्या मृत्यूमागे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत वारिसेंच्या हत्येमुळे सरकारची बेअब्रू झाल्याची टीका राऊतांनी केली.

वारिसेंच्या हत्येचा तपास करण्यासाठी जरी सरकारने एसआयटी नेमली असली त,री तिचा तपास निःपक्षपाती होईल का, अशीच शंका आहे.

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वारिसे यांना चिरडून टाकण्यात आलं, त्या पेट्रोल पंप आणि त्या आजू-बाजूचे ३-४ सीसीटीव्ही एकचा वेळी बंद कसे, असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला. 

वारिसेंच्या कुटुंबाला सरकारनं ५० लाखांची मदत करावी अशी मागणीही राऊतांनी यावेळी केली. तसेच वारिसेंच्या कुटुंबाचा आक्रोश सरकारनं ऐकला पहिजे.

यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान प्रमुख प्रश्नांवर उत्तरंच देत नसल्याचे म्हणत राहुल गांधींच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी त्यांना नोटीस देण्यात आली.

नुकताच झालेली बीबीसी कार्यालयावरील कारवाई म्हणजे माध्यमांना दिलेला इशारा असल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले. देशात लोकशाही आहे कुठे असा खोचक प्रश्नदेखील राऊतांनी यावेळी उपस्थित केला.