Sanjay Raut : 'रस्त्यावर पवार पवार म्हणत दगड मारत फिरालं', मनसेचं राऊतांना काळजीपोटी पत्र

मनसेचं राऊतांना काळजीपोटी पत्र
Sanjay Raut MNS sandeep Deshpande letter sharad pawar
Sanjay Raut MNS sandeep Deshpande letter sharad pawar

MNS on Sanjay Raut: राज्यात सत्तांतर आणि नुकतचं निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे खासदार संजय राऊत आक्रमक भूमिका घेत वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. अशातच मनसेनं राऊतांना काळजीपोटी पत्र लिहलं आहे. ( Sanjay Raut MNS sandeep Deshpande letter sharad pawar Maharashtra Politics)

मनसेच्या संदीप देशपांडे यांनी काळजीपोटी पत्र लिहित खोचक सल्ले दिले आहेत. संजय राऊत यांनी दोन हजार कोटींची डील झाली, हा न्याय नाही, असा मोठा आरोप केला आहे.

त्यानंतर, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका गुन्हेगाराला आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप करत यासंदर्भातील तक्रार पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे देण्यात आली आहे. राऊतांच्या या आरोपानंतर मनसेनं पत्र लिहिलं आहे.

वेळीच स्वत:ला सावरले नाही, तर पवार... पवार... ओरडत रस्त्यावर दगड भिरकावयाची वेळ येईल, असा टोलाही लगावला आहे.

काय म्हणालेत पत्रात?

हे येडxx मला का पत्र लिहतंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात.

आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात.

माणूस attention seeking होतो. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी.

माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा.

त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे.

त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल (guilty feeling ) मनाला लावून घेतली आहे, ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच ह्या -हासाला जबाबदार नाहीत. उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या.

नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार... पवार....असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच ! पटलं तर घ्या...नाही पटलं तर चू xx आहे असं म्हणून विसरून जा !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com