बाळासाहेबांची 56 वर्षाची शिवसेना नष्ट करण्याचा 'दिल्ली'चा डाव - संजय राऊत

केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे यांना शिवसेनेबद्दल पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहे.
Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis
Sanjay Raut Eknath Shinde Devendra FadnavisSakal

दिल्ली : शिवसेना कुणाची? शिंदेंची की ठाकरेंची? हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला असून दोन्ही गटाने आपापले पुरावे सादर करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आयोगावर टीका केली आहे. शिवसेनेला नष्ट करणार डाव 'दिल्ली'चा आहे असा आरोप त्यांनी भाजपवर लावला आहे.

(Sanjay Raut On Election Commission For Shivsena)

दरम्यान, काल केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला पुरावे सादर करण्याचे आदेश दिले असून ८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत दोन्ही गटाला हे पुरावे सादर करावे लागणार आहेत. यावर संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रातील जनतेसाठी ही धक्का देणारी बातमी आहे. बाळासाहेबांनी ५६ वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही शिवसेना स्थापन केली आहे. आणि आज निवडणूक आयोग जर याच शिवसेनेला पुरावे मागत असेल तर हे धक्कादायक आहे. दिल्लीला शिवसेना नष्ट करण्याची इच्छा आहे. पण उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे एकमेव नेते आहेत." असं मत राऊतांनी व्यक्त केलं आहे.

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis
Chandrakant Patil: 'मनावर दगड ठेवून 'ते' भाषण भाजपने हटवलं, नेटकरी संतापले

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला फूट पाडली असून भाजपसोबत आपले नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. आमच्याकडे बहुमत असल्याने शिवसेना आमचीच आहे असा दावा शिंदे गटाने केला असून शिवसेना आमची असून आमच्या हातातून कुणी शिवसेनेला हिसकावून घेऊ शकत नाहीत असं उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतर हा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला आहे. त्यानंतर आता शिवसेनाचा खरा मालक कोण याबद्दलच्या आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून आयोगाचा निर्णयामुळे राज्यातील राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com