
शिवसेनेने एक जागा गमावली; संजय राऊत म्हणाले...
मुंबई : नाट्यमय घडामोडीनंतर राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल रात्री लागला आहे. या निवडणुकीत भाजपचे तीन आणि मविआच्या तीन उमेदवारांनी बाजी मारली आहे. दरम्यान शिवसेनेच्या संजय पवारांना पराभव स्विकारावा लागला आहे. भाजपाचे तीनही उमेदवार निवडून आले आहेत त्यामुळे त्यांच्याकडून जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे.
(Sanjay Raut On Rajyasabha Result)
शिवसेनेच्या संज पवारांचा यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यातील चुरशीच्या लढाईत महाडिकांनी बाजी मारली. यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हेही वाचा: 4 राज्ये, 16 जागा; राज्यसभा निवडणुकीत कोण मारली बाजी? जाणून घ्या एका क्लिकवर..
"आमच्या पहिल्या पसंतीची मत संजय पवारांना पडली आहेत. भाजपकडून उगाच मोठा विजय झाल्याचं चित्र उभं केलं जात आहेत. पण काही अपेक्षित मत आम्हाला मिळाली नाही हे आम्हाला माहिती आहे." असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, "राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया किचकट असते त्यामध्ये त्यांना विजय मिळाला, त्यांचे अभिनंदन..." असं म्हणत त्यांनी भाजपचे अनपेक्षितपणे अभिनंदन केले आहे. "आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले त्यांच्याकडे गेले नाहीत, काही अपक्ष त्यांच्याकडे गेले आहेत, त्यांनी व्यूहरचना उत्तम केली होती त्यामुळे त्यांचा विजय झाला." असं मत राऊतांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा: Rajyasabha Election Result Live: निवडणुकीच्या आखाड्यात धनंजय महाडिकांची बाजी
काल सायंकाळी मतदान झाल्यावर भाजपने मविआच्या काही मतांवर आक्षेप घेतला होता. पण निवडणूक आयोगाच्या बैठकीत मविआचे एक मत अवैध ठरवलं. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, माझं एक मत त्यांनी बाद करायला लावलं, निवडणूक आयोगाने त्यांना प्रेफर केलंय." असं संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान कालच्या नाट्यमय घडामोडीनंतर रात्री उशीरा मतमोजणीला सुरूवात झाली आहे. त्यानंतर भाजपच्या तीन, शिवसेनेचा एक, राष्ट्रवादीचा एक आणि काँग्रेसचा एका उमेदवारांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे.
Web Title: Sanjay Raut On Rajyasabha Election Result Sanjay Pawar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..