क्रिकेट खेळत नसलो तरी, गुगली टाकता येते; राऊतांची फटकेबाजी | Sanjay Raut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

क्रिकेट खेळत नसलो तरी, गुगली टाकता येते; राऊतांची फटकेबाजी

पुणे : शिवसेनेचे नेते संजय राऊत हे नेहमी त्यांच्या विविध विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळीदेखील त्यांनी असेच एक विधान केले आहे. आपण क्रिकेट खेळत नसलो तरी मला त्यातलं ज्ञान असून, मला सगळ्या गुगल्या टाकता येतात. कारण बाळासाहेबांची मला शिकवण आहे, पवार साहेब ही सोबतीला आहेत असे म्हणत मला दोन गुरू आहेत त्यामुळं मैदानात बघा असे ते म्हणाले. माझा आत्मविश्वास तुम्हाला माहीतच आहे. इकडची दुनिया तिकडे करू. हे दार नाही तर ते दार, ते दार नाही तर पलीकडचं दार. आपण कुठं ही जाऊ, पण शिवाजी आढळरावपाटील संसदेत जाणारच असं स्पष्ट मत संजय राऊतांनी व्यक्त केलं. ते लांडेवाडी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

राऊत म्हणाले की, आज आपल्याकडे इथं खासदार आणि आमदार नाहीत. म्हणून उमेद हरवू नका. कारण आज नाहीत म्हणजे उद्या नसणार असं नाही. हे लक्षात असू द्या. कारण हे राजकारण अन मतदार हे चंचल असतात. गंगुबाई काठेवाडी सिनेमा पहा, आम्ही सिनेमे फार पाहतो. शिवाजी आढळराव हे 24 बाय 7 अॅक्टिव्ह असतात. पण शिरूरचे खासदार कधी दिसतात का तुम्हाला असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. आता महाआघाडी असल्याने मला काही पथ्य, बंधनं पाळावी लागतायेत. जी माझ्या तत्वात बसत नाहीत, नाहीतर हा राऊत गप बसला असता का? असेही ते म्हणाले.

भाजपसोबत असताना कुठं सोन्याच्या माळा होत्या

राज्यात भाजपसोबत असताना कुठं आमच्या घरावर सोन्याच्या माळा होत्या. पण आजची परिस्थिती खूप बरी आहे. मागील पाच वर्षे ही काळीकुट्ट होती, हे पुढच्या काळात तुम्हाला कळेलच असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Sanjay Raut On Shivaji Adhalrao Patil In Landewadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top