Sanjay Raut| संजय राऊत जेलमधून लिखाण करतायत?; मनसेची शंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut saamana rokhthok  sandeep deshpande

संजय राऊत जेलमधून लिखाण करतायत?; मनसेची शंका

संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. अशातच संजय राऊत हे शिवसेना मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक असल्याने राजकीय वर्तुळात त्यांची भूमिका कोण पार पाडत आहे. अस सवाल उपस्थित होत आहे. अशातच मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्विट करत अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी आहेत का असा प्रश्न उपस्थित केला आहे.(sanjay raut saamana rokhthok sandeep deshpande)

सामना अग्रलेखात रविवाराचा रोख-ठोक संजय राऊत यांच्या नावाने लिहण्यात आला आहे. यामध्ये राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. संजय राऊत ईडीच्या कोठडीत असुनही त्यांच्या नावाने रोख ठोकचा लेख पाहिला असता राजकीय वर्तुळात अनेक सवाल उपस्थित होत आहेत.(sanjay raut ED)

दरम्यान, संदीप देशपांडे यांनी ट्विट करत रोखठोकवर प्रश्न उपस्थित केला आहे. 'आज सामना मध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत? ' असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे काल संजय राऊत यांनी ईडीकडून अटकेच्या कारवाईनंतर पाठिंबा जाहीर करणाऱ्या मित्र पक्षांचे ईडीच्या कोठडीतून पत्र लिहून आभार मानले आहेत. हे आभार मानताना त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणुकीचा उल्लेखही केला आहे.

ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्षांनी राऊतांना पाठिंबा दिला होता. ईडीकडून अटक झाल्यानंतर राहुल गांधींसह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी ट्विट करत संजय राऊत यांना पाठिंबा जाहीर केला होता.

Web Title: Sanjay Raut Saamana Rokhthok Sandeep Deshpande Maharashtra Political Crisis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..