...तर अख्खा महाराष्ट्र आमच्या पकडीत येईल- संजय राऊत

महापालिकेच्या आगामी निवडणुका आल्या असून सेनेत दुफळी निर्माण झाली आहे.
...तर अख्खा महाराष्ट्र आमच्या पकडीत येईल- संजय राऊत
esakal

आता आमच्यासाठी संपूर्ण आभाळ खुलं आहे. त्यामुळे आम्ही जी गरुड झेप वाघाची झेप घेऊ त्यातून अख्खा महाराष्ट्र आमच्या पकडीत येईल असे वक्तव्य शिवसेना संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर असताना केले.(Sanjay Raut said on Mumbai, Thane Navi Mumbai Municipal Corporation elections maharashtra politics)

महापालिकेच्या आगामी निवडणुका आल्या असून सेनेत दुफळी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपा यांचे सरकार राज्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे असा संभ्रम असलेल्या सेनेच्या सैनिकांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसते. या बंडानंतर आता शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांसमोर ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिंवली येथे पक्षाचे अस्तित्त्व टिकवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

...तर अख्खा महाराष्ट्र आमच्या पकडीत येईल- संजय राऊत
"मोदी ठाकरेंना धाकटा भाऊ मानतात, त्यामुळे...";शंभुराज देसाईंची ऑफर

या सर्वांवर बोलताना, राऊत यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत शिवसेनेचेच नगरसेवक निवडून येतील असा प्रबळ दावा ठोकला आहे. पुन्हा पक्ष बांधणीसाठी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असल्याचे समजते. दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महापालिकेच्या आगामी निवडणुकावर बोलताना, तीनही महापालिकेची मुदत संपल्यामुळे तिथ प्रशासक आहेत. त्यामुळे इकडून २२ लोक गेले तिकडून वीस लोक गेले. असे आकडे असू शकतात पण नगरसेवक गेले अस म्हणणे चुकीचे आहे. असे म्हणत, मुंबई, ठाणे, नवी मुंबईत शिवसेनेचेच नगरसेवक निवडून येतील हे कदाचित माजी नगरसेवक असतील असे राऊत यांनी म्हटले आहे.

त्यानंतर त्यांनी आज केलेल्या जब ''खोने"के लिए कुछ भी ना बचा हो तो "पाने" के लिए बहुत कुछ होता हैं!. जय महाराष्ट्र !.' या ट्विटसंदर्भात विचारले असता. हो हे खरचं आहे. आता आमच्यासाठी संपूर्ण आभाळ खुलं आहे. आता आम्ही जी गरुड झेप वाघाची झेप घेऊ त्यातून अख्खा महाराष्ट्र आमच्या पकडीत येईल. असे सध्या राज्यात वातावरण निर्णाण झालं आहे. असे आव्हानात्मक विधान राऊत यांनी यावेळी केले.

लोक शिवसेनेच्या मागे उभे आहेत. ते एका चिडीतून उभे आहेत. अरे महाराष्ट्रात कसं घडू शकत. ज्या मातोश्रीने भरभरुन दिल त्यांच्या बाबतीत जे घडलं ते जनतेला आजिबात आवडलेलं नाही. असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

...तर अख्खा महाराष्ट्र आमच्या पकडीत येईल- संजय राऊत
शिंदे गटाच्या आमदाराचा बॅनरवर घोळ, दिघेंच्या जागी प्रसाद ओकचा फोटो

महाराष्ट्रात जे घडल त्याला भाजप जबाबदार आहे. सत्तानाट्य हे दिल्लीच कारस्थान आहे. महाराष्ट्राची बदननामी करण तुकडे करण. मुंबईला आमच्या पासून तोडण. आणि त्यासाठी शिवसेना कमजोर करण. हे सर्व भाजपच कारस्थान आहे. अशा शब्दात राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com