esakal | आमच्या मित्रपक्षांनीही अयोध्येला यावे : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

आमच्या मित्रपक्षांनीही अयोध्येला यावे : संजय राऊत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. माझे असे मत आहे, की आमच्या मित्रपक्षांनीही अयोध्येला यावे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या 100 दिवसपूर्तीला उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. 29 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षांच्या पाठिंब्यावर राज्यात सत्तास्थापन केली. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मार्च महिन्यात या सरकारला 100 दिवस पूर्ण होतील. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला मोठे यश मिळाले होते. राज्यातील 48 जागांपैकी भाजपने 23, तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. 15 जून 2019 रोजी उद्धव यांचा अयोध्या दौरा पार पडला. त्याआधी 25 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. 

याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, की राज्याचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. महाराष्ट्र सरकारला 100 दिवस पूर्ण होत असल्यानिमित्त आम्ही तेथे जात आहोत. सरकारमधील आमच्या मित्रपक्षांनीही आमच्यासोबत यावे. राहुल गांधीही मंदिरात जाऊन पूजा करतात. त्यामुळे त्यात काय चूक आहे.