पुढच्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव यांच्या बाजूला बसलेला असेल- राऊत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

मुंबई : पुढच्या विजयादशमीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव यांच्या बाजूला बसलेला असेल असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मी आज सकाळी कुठेतरी वाचलं की आज शिवसेनेचे शक्तीप्रदशन आहे. पण दसरा मेळाव्याला शक्ती प्रदशन म्हणणे चुकीचे आहे. शक्ती प्रदर्शन करण्याची शिवसेनेला गरज नाही.

मुंबई : पुढच्या विजयादशमीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव यांच्या बाजूला बसलेला असेल असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मी आज सकाळी कुठेतरी वाचलं की आज शिवसेनेचे शक्तीप्रदशन आहे. पण दसरा मेळाव्याला शक्ती प्रदशन म्हणणे चुकीचे आहे. शक्ती प्रदर्शन करण्याची शिवसेनेला गरज नाही. 

शिवसेना ही महाराष्ट्र्र केसरी आणि आता हिंद केसरी आहे. आमच्यासमोर कोणताही पहेलवान टिकला नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 2019 च्या निवडणुकीसाठी सज्ज असून शिवसेना शांत दिसत आहे पण शांत समजू नका, काही बंधनने आहेत. कारण युतीत आहोत. दोस्तीत कोणता स्वार्थ नाही. निखळ आणि पारदर्शक मैत्री दोन पक्षात आहे. आम्ही दोस्ती आणि नाती पाळतो. 

आकड्यात आणि वाकड्यात जाऊ नका असा इशारा संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे. अब की बार 100 की पार !  शिवसेना काय आहे? शिवसेनेचं तेज काय आहे हे दाखवून द्यायचं असल्याचेही राऊत यांनी यावेळी म्हटले आहे. अनेक लाटा येतात आणि जातात आशा अनेक लाटा आम्ही पचावल्या आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले. 

राष्ट्राला महाराष्ट्राची तर महाराष्ट्राला शिवसेनेची गरज- नितीन बानुगडे पाटील
शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे की शेतकऱ्यांच्या गवताची काडी देखील सावकाराकडे गहाण पडता कामा नये. शेतकरी हा कर्जमुक्त झालाच पाहिजे. कोण बोलतं शिवसेनेला शेती कळत नाही पण शिवसेनेलाच शेतीतले कळते. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे काम शिवसेना करणार असल्याचे शिवसेनेचे नितीन बानुगडे पाटील यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. 

बानुगडे पाटील म्हणाले की, पूर परिस्थितीत देखील मदतीचा पूर घेवून आली ती फक्त शिवसेना होती. उद्धवसाहेब यांच्या नेतत्वाखाली आंदोलन झाले आणि पीक विम्याचे लाखो रुपये शेतकऱ्यांना मिळाले. महिला सक्षमीकरण करण्याचे काम शिवसेनेने केलं आहे. शिवसेना पक्षाने कधीच जात धर्म पहिला नाही. खांद्यावरील भगवा झेंडा हा बलिदानाचा आहे, विश्वासाचा आहे आणि हा भगवा झेंडा शिवसेनेने तो हाती घेतला असल्याचे बानुगडे पाटील यावेळी म्हणाले. राष्ट्राला महाराष्ट्राची गरज आहे तर महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेचे 100हून अधिक आमदार येणार- सुभाष देसाई
आमचीही ब्लु प्रिंट तयार आहे. शिवसेनेमुळे मराठी माणसांना 80 टक्के नोकऱ्या मिळाल्या आहेत. थेट नोकऱ्या नाही मिळाल्या पण, पण कंत्राटी नोकऱ्यांमध्ये 80 टक्के नोकऱ्या भूमिपुत्रांना मिळणार असा कायदा आम्ही करणार आहोत.  आम्हाला कोण अडवतो बघून घेऊ.  शिवसेनेच्या 100 हुन अधिक आमदारांचे औक्षण करायला तयार रहा असेही सुभाष देसाई यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut Speak in Shivsena Dasara melava in mumbai