Sanjay Raut : "वाटलं कोणीतरी मायचा लाल उभा राहील पण..." ; राऊतांचा थेट केंद्रीय नेत्यांवर निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut targets central leaders

Sanjay Raut : "वाटलं कोणीतरी मायचा लाल उभा राहील पण..." ; राऊतांचा थेट केंद्रीय नेत्यांवर निशाणा

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील सत्तेचा अनधिकृत डाव उधळला जाईल. ३५ ते ४० लोक गेल्याने आम्हाला फरक पडत नाही. न्यायालयावर आमचा विश्वास आहे, असे संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महारांजाचा पुन्हा ऐकेरी उल्लेख केल्यामुळे खोचक टीका केली आहे. (Sanjay Raut targets central leaders)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर भाजप आणि शिंदे गट गप्प आहे, असे राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी शिवीचा वापर केला. त्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आलं आहे.

संजय राऊत म्हणाले, केंद्राच्या राजकीय दबावापोटी महाराष्ट्रात अनाधिकृत सरकार आलेलं आहे. तो डाव उधळला जाईल. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना आणि संविधान दिले आहे. त्याचा साक्षात्कार देशाला होईल.

हेही वाचा: Bhagatsingh Koshyari : अखेर राज्यपालांची कबुली; 'माझ्यासाठी हे पद अयोग्यच...'

१२ जानेवारीला १६ आमदारांच्या अपात्रेबाबत सुनावणी होणार आहे, यावर संजय राऊत म्हणाले, खरी शिवसेना एकचं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापणा केलेली शिवसेना एकच आहे. उद्धव ठाकरे करत असलेल्या शिवसेनेसोबत आम्ही आहोत. ३०-४० लोक गेले म्हणजे पक्ष संपला नाही. निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. पण यावरी नियुक्त्या केंद्र सरकार त्यांच्या मर्जीने करते. तरी आमचा निवडणूक आयोगावर आमच्या विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळेल.

हेही वाचा: Karuna Munde: उर्फी प्रकरणात धनंजय मुंडेंच्या पत्नीची उडी, 'त्या' महिला नेत्या बिनडोक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महारांजाचा पुन्हा ऐकेरी उल्लेख केला. संजय राऊत म्हणाले याविरोधात आम्ही लढतो आहोत. सरकारमध्ये खुर्च्यांना जे फेविकॉल लावून बसले आहेत. ते इतर सगळ्या विषयांवर बोलतात. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर बोलत नाहीत. मला असं वाटलं होत कोणीतरी मायचा लाल स्वाभीमानी केंद्रीय मंत्री उभा राहील आणि राजीनामा देईल. महाराष्ट्रात परत येईल. पण सगळे ***** औलाद आहेत.

हेही वाचा: Supriya Sule : सुप्रिया सुळे सकाळीच पोहोचल्या सिंहगड किल्ल्यावर; राष्ट्रवादीकडून...