Sanjay Raut : "फडणवीस हिंमत असेल तर ते काडतूस भ्रष्टाचारांच्या..." ; राऊतांचा तोल सुटला!

Sanjay Raut
Sanjay Raut

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'फडतूस' गृहमंत्री संबोधले होते.

यामुळे फडणवीसही चांगलेच संतापले होते. ठाकरेंवर निशाणा साधत ते म्हणाले, मी फडतूस नसून काडतूस आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. 

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

संजय राऊत म्हणाले, फडणवीस काडतूस असतील तर त्यांनी ते काडतूस भ्रष्टाचाऱ्यांच्या कुठे घालायाचे ते घाला. तर तुम्ही खरे गृहमंत्री आहात. 

भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन बसलेले फडणवीस विरोधकांना काडतूस फेकून मारतात ते पण भिजलेली. यांना काहीही प्रतिष्ठा नाही बेकायदेशीरपणे काम सुरू आहे. गुंडाना भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. हे सरकार गुंडांच्या टोळ्या आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut
BJP Foundation Day 2023: लोकसभा-विधानसभेसाठी भाजपचा निर्धार! विरोधकांना भुईसपाट करण्यासाठी आखला मास्टर प्लॅन!

संजय राऊत म्हणाले, १० वेळा यांनी त्यांची आई बदलली आहे. बेईमान लोकांना मंत्री बनवण्याची भाजपला सवय आहे. यामध्ये नारायण राणे, एकनाथ शिंदे आहेत. यांची राजकारणात आणि समाजात काहीच प्रतिष्ठा नाही. 

ईडी- सीबीआय राजकीय विकोधकांच्या बाबतीत चुकीचा वापर केला जातो ही आमची भूमिका आहे. भाजपच्या वाशिंग मशिनमध्ये टाकलेल्या लोकांवर कारवाई का होत नाही. मी गेल्या १५ दिवासत गृहमंत्री आणि सीबीआय आणि ईडीकडे ५०० कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे दिले आहेत तरी कारवाई होत नाही, असे राऊत म्हणाले. 

Sanjay Raut
Pune Politics: पुण्यातील आजी-माजी आमदारांनी एकमेकांच्या विरोधात थोपटले दंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com