'हा' घोटाळाही उघड करा; संजय राऊत यांचे किरीट सोमय्यांना पत्र

sanjay raut
sanjay rautesakal

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत आहेत. सरकारमधील अनेक मंत्र्यांवर व अन्य नेत्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.. या पार्श्वभूमीवर उत्तर म्हणून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (shivsena mp sanjay raut) यांनी किरीट सोमय्या यांना एक खळबळजनक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये संजय राऊत यांनी सोमय्या आणि भाजपवर जोरदार टीका केलीय. नेमके काय म्हणाले संजय राऊत...

संजय राऊत यांचे किरीट सोमय्यांना खळबळजनक पत्र

इतर घोटाळे उघडकीस आणता. तसंच हा घोटाळाही उघड करा, असं संजय राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलंय. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा ' स्कॅम क्रूसेडर ' असा उल्लेख करत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी एक पत्रच सोमय्या यांना धाडलं आहे. भाजपची सत्ता असलेल्या एका महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील घोटाळ्याकडे या पत्राच्या माध्यमातून सोमय्या यांचे लक्ष वेधून ईडीपर्यंत हे प्रकरण पोहचवण्याची विनंती राऊत यांनी केली आहे. 'त्या' घोटाळ्याच्या फाइलचा अभ्यास करून तुम्ही लवकरच मोठा गौप्यस्फोट कराल अशी अपेक्षा आहे, असेही राऊत यांनी पुढे पत्रात नमूद केले आहे.

sanjay raut
100 कोटी डोस : जागतीक आरोग्य संघटनेनं केलं भारतीयांचं अभिनंदन

तब्बल ५०० ते ७०० रुपयांचा घोटाळा

राऊत यांनी सोमय्या यांना लिहिलेल्या पत्रात पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात ५०० ते ७०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. पिंपरी चिंचवड दौऱ्यात सुलभा उबाळे आणि इतर प्रमुख नेत्यांनी माझ्याकडे या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे सोपवली. २०१८-१९ या आर्थिक वर्षात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शेकडो कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. या निविदा सदोष होत्या. यात क्रिस्टल इंटाग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि आर्कुस या दोन कंत्राटदारांना ५०० कोटीपेक्षा अधिकची कंत्राटे देण्यात आली. मात्र, कामांसाठी ठरवून दिलेली मुदत संपूनही ५० टक्के कामेही या कंत्राटदारांनी पूर्ण केली नाहीत. दोन कंपन्यांच्या हितासाठी हे सगळं करण्यात आलं आणि सरकार व जनतेचा पैसा या कंत्राटदारांच्या घशात घालण्यात आला. या संपूर्ण प्रकल्पातच मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून आपण अनेक घोटाळे बाहेर काढले असल्याने मी तुमचे या घोटाळ्याकडे लक्ष वेधत आहे, असे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे. या घोटाळ्याचे पुरावे असलेली संपूर्ण फाइल मी तुमच्याकडे सोपवत आहे, असे नमूद करताना त्याचे कारणही राऊत यांनी पुढे नमूद केले आहे.

sanjay raut
Drugs Case: शाहरुखच्या 'मन्नत'वर NCBची टीम

घोटाळ्याची फाइल थेट तुमच्याकडे पाठवतोय

आपण जी प्रकरणे ईडीच्या निदर्शनास आणून दिली त्या बहुतेक प्रत्येक प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ही बाब ध्यानात घेऊन घोटाळ्याची फाइल ED किंवा इतर कोणत्याही तपास यंत्रणेकडे न देता थेट मी तुमच्याकडे पाठवत आहे. याप्रकरणाची तुम्ही चौकशी कराल आणि त्यात काही तथ्य आढळल्यास पुढील चौकशीसाठी फाइल ईडीकडे सोपवाल, अशी अपेक्षा आहे. त्यातही घोटाळ्याचा आरोप खोटा आहे असे तुम्हाला वाटले तर तुम्ही घोटाळ्यात जे कुणी सहभागी असतील त्यांना जाहीरपणे क्लीन चिट देऊन टाका, असा खोचक सल्लाही राऊत यांनी दिला आहे. पिंपरी चिंचवडमधील क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा घोटाळा खूप मोठा असून जनहितार्थ बाब म्हणून आपण हा घोटाळा सर्वांसमोर आणावा, अशी आपणास विनंती असल्याचेही राऊत यांनी पुढे नमूद केले आहे.

मी हे प्रकरण ईडीकडे देईन

एकच व्यक्ती भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडतेय, दुसरं काही महाराष्ट्रात होत नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात सगळ्यांनी लढाई केली पाहिजे. जे लढतात त्यांच्याकडे अजून काही प्रकरण पाठवावीत असं मला वाटतं. मी हे प्रकरण ईडीकडे देईन. पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील 700 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यापूर्वीच्या सरकारमधील अनेक लोकांचा सहभाग या घोटाळ्यात असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com