Sanjay Raut and Narayan Rane
Sanjay Raut and Narayan Rane

Sanjay Raut : माझ्या नादाला लागू नका, नाही तर...; राऊतांचा राणेंना थेट इशारा

मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पुन्हा एकदा सत्ताधारी शिंदे गटावर कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी चौफेर टीका करत भाजपनेते आणि केंद्रीयमंत्री नाराय़ण राणे यांच्यावरही हल्लाबोल केला. तसेच आपण यापूर्वी राणे यांच्याविषयी काहीही बोललो नाही, असं म्हणत राऊत यांनी राणेंवर टीकास्त्र सोडलं. (Sanjay Raut news in Marathi)

Sanjay Raut and Narayan Rane
Maharashtra Politics: विदर्भात उद्धव ठाकरे गटाला दणका, 14 पदाधिकारी आज शिंदे गटात!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याबाबत राऊत म्हणाले की, आदित्यनाथ यांच्याविषयी आज आम्ही आग्रलेख लिहिला आहे. त्यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे. मुंबई देशाचं पोट भरते. येथे देशभरातून लोक पोट भरण्यासाठी येतात. आम्ही त्यांना प्रेमाने सांभाळतोच, असंही राऊत यांनी नमूद केलं.

मी नारायण राणेंवर कधीही आग्रलेख लिहिला नाही. ते म्हणत असतील हे कारागृहात जाणार आहेत, तर त्यांनी आमचा कारागृहात जाण्याचा मार्ग मोकळा करू द्यावा. त्यांच्यासारखे आम्ही डरफोक आणि पळपुटे-भित्रे नाहीत. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाहीत, असंही राऊत म्हणाले.

Sanjay Raut and Narayan Rane
Sushma Andhare : मला डायरेक्ट शूट करण्याऐवजी...; सुषमा अंधारे यांचा खळबळजनक दावा

दरम्यान हिमतीच्या, धाडसाच्या गोष्टी ते बोलतात, त्यांनी बोलाव्यात. मी अजुनपर्यंत त्यांच्याविषयी काहीच बोललो नाही. मात्र त्यांनी धमक्या देऊ नये, धमक्या द्यायच्या असेल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो मी. माझ्या नादाला लागू नका, झाकली मुठ सव्वालाखाची, म्हणत राऊत यांनी राणेंना इशारा दिला.

हे काय मला जेलमध्ये टाकतात. मी हिंमतीने जेलमध्ये गेलो. तुमच्यासारखी शरनागती पत्कारली नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. घाला मला जेलमध्ये, अस आव्हान राऊत यांना दिलं. तसेच राणेंची सर्व आर्थिक प्रकरणे बाहेर काढली, तर ते ५० वर्षे सुटणार नाहीत, असंही राऊत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com