मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून केले गेलेल्या प्रयत्नांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबरच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गुजरात दंगल प्रकरणात कसे वाचविले याबाबतचे खळबळजनक दावे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात करण्यात आले आहेत.