Eknath shinde: 'शिंदे गटचं नाही तर अजित पवारांच्या महायुती प्रवेशाने भाजपमध्ये देखील नाराजी', शिवसेना नेत्याचा दावा

मंत्रीपदावरून शिंदे गटाच्या इच्छुक आमदारांमध्ये मोठी खदखद असल्याची चर्चा
Eknath shinde
Eknath shindeEsakal

अजित पवार यांच्या महायुतीतील सामील झाल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार सोबत आल्यामुळे शिंदे गटाच्या मंत्रिपदाला कात्री लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांची नाराजी दूर करण्याच्या कामाला लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून काल आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आणि त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

तर शिंदे गटासोबतच भाजपचे देखील आमदार अजित पवार यांच्या महायुतीत येण्यामुळे नाराज झाले असल्याचे शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे. अजित पवार यांच्या महायुतीत येण्यामुळे सत्तेची पदं गेल्यामुळे शिंदे गटातच नाराजी पसरली नसून भाजपमध्ये देखील आहे, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. (Marathi Tajya Batmya)

Eknath shinde
Eknath shinde: 'आता जे झालंय ते पॉलिटिकल Adjustment...' एकनाथ शिंदेंनी आमदार, खासदारांची घातली समजूत

तर अजित पवार यांचा महायुतीत प्रवेश करणं भाजपच्या काही नेत्यांना पटली नसल्याची आता चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मंत्रिपद गेल्यावर आमदारांमध्ये नाराजी पसरते आणि ते साहजिकच आहे. याला तुम्ही नाराजी किंवा बंडखोरी म्हणू शकत नाही. आता हा प्रकार फक्त शिवसेनेत (शिंदे गटात) नाही तर भाजपमध्ये देखील आहे. भाजपचे देखील 105 आमदार आहेत. त्यामध्ये काही अपक्ष आमदार देखील आहेत. त्यामुळे त्यांच्यात देखील थोडीफार नाराजी असणार आणि ती आहे.(Latest Marathi News)

Eknath shinde
Bhujbal On retirement: शरद पवारांना रिटायर व्हा म्हणणारे अजित पवार ठरवणार भुजबळांची रिटायरमेंट...

मात्र या दोन्ही पक्षाच्या आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता करू नका असे सांगितले आहे. तर आपण योग्य तो निर्णय योग्य त्यावेळी घेऊ असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्याचं शिरसाट म्हणालेत. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देतांना शिरसाट बोलत होते. (Marathi Tajya Batmya)

Eknath shinde
NCP Crisis : राज्यात मोठा राजकीय भूकंप; शहांची तिसरी पिढी शरद पवारांसोबत!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com