Sanjay Shirsat : तिने काय-काय लफडी केली, हे…अंधारेंवर टीका करताना शिरसाटांच वादग्रस्त विधान

राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गटाचे नेते वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत.
Sanjay Shirsat
Sanjay Shirsatesakal

सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत… अशा शब्दात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गटाचे नेते वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. शिरसाटांच्या वा वादग्रस्त विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Sanjay Shirsat Controversial Statements )

ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून पक्षबांधणी सुरु आहे. या दरम्यान त्या भाजपसह शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. या दौऱ्यात त्या सातत्याने शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख ‘माझे भाऊ’ असा करत उपरोधिक टोलेबाजी करत आहेत. हाच मुद्दा पकडत शिरसाट यांनी प्रत्युत्तर देताना गलिच्छ भाषेत टीका केली आहे.

Sanjay Shirsat
Sharad Pawar: केंद्रीय मंत्र्यांची थेट शरद पवारांना ऑफर; NDA सोबत युती?

काय म्हणाले शिरसाट?

ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत. अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत.

Sanjay Shirsat
Rahul Gandhi: त्यासाठी सावरकर व्हा! राहुल गांधींना ठाकरेंच्या कानपिचक्या

तसेच, शिरसाट यांनी दावा केला की ठाकरे गटानेच नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत आपल्याकडे नाराजी व्यक्त केला आहे. संजय शिरसाट म्हणाले की, अंबादास दानवे यांनी मला फोन केला. म्हणे ती बाई (सुषमा अंधारे) डोक्याच्या वर झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com