जायकवाडी : संत एकनाथ महाराजांचे चरित्र आता ब्रेल लिपीत उपलब्ध झाले आहे. शांतिब्रह्म प्रकाशनतर्फे त्याचा प्रकाशन समारंभ पैठण येथे आयोजित करण्यात आला. या निमित्ताने दृष्टिहिनांना शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांच्या चरित्राचे वाचन करता येणार आहे. .ज्ञानेश्वरीसह अनेक ग्रंथ ब्रेल लिपीत उपलब्ध आहेत. मात्र, कोणत्याही संतांचे चरित्र या लिपित उपलब्ध नाही. त्यावर संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज योगीराज महाराज गोसावी यांच्या संकल्पनेतून प्रथमच ‘संत एकनाथ महाराजांचे ब्रेल लिपीतील चरित्र’ प्रकाशित करण्यात आले. शांतिब्रह्म एकनाथ महाराज मिशनचे या प्रकल्पास योगदान मिळाले. .या चरित्रग्रंथाचे प्रकाशन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, आमदार विलास भुमरे, आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले, नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज, भगवानगडचे उत्तराधिकारी कृष्णा महाराज, आचार्य अमृताश्रमस्वामी महाराज, विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूरचे विश्वस्त श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, धर्मवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले तसेच नाथवंशज उपस्थित होते..कोकणातील हर्णे गावी योगीराज महाराज गोसावी यांची भरत जोशी यांच्याशी भेट झाली. जोशी यांनी यापूर्वी ब्रेल लिपीतील काही पुस्तके लिहिली आहेत. गोसावी यांनी संत एकनाथ महाराजांच्या ब्रेल लिपीतील चरित्राबाबत प्रस्ताव मांडला. अमरावतीच्या अनिल ढवळे यांनी त्याचे ब्रेल लिप्यंतर केले. प्रकाशनप्रसंगी अंध शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी या चरित्राचे वाचन केले..काय आहे चरित्रातब्रेल लिपीतील या चरित्रग्रंथात नाथांचा जन्म व बालपण, अलौकिक बुद्धिसामर्थ्य, सद्गुरूंच्या शोधात जनार्दन स्वामींची भेट, लेखणीबरोबर तलवारबाजीत निष्णात योद्धे, हिशेबात अधेलीची चूक, श्री दत्तात्रेयाचे दर्शन, मलंग वेशातील दत्तात्रेय कोण?, उद्धरेत् आत्मनात्मानम्, नाथांना सावळ्या परब्रह्माचे दर्शन, शिष्य-गुरू तीर्थयात्रा, चतुःश्लोकी भागवताची रचना, सद्गुरूंचे पैठणला आगमन, गृहस्थाश्रमात प्रवेश, श्रीखंड्याचा प्रवेश, शांतीचा पुतळा, समत्वदृष्टी, श्रीखंड्याची करामत, दासांचा दास हा श्रीहरी, ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण, नाथांचा भागवत ग्रंथ, प्राण्यांविषयी दयाभाव, भावार्थ रामायण, नाथांची जलसमाधी या प्रकरणांद्वारे माहिती देण्यात आली आहे..‘‘ब्रेल लिपीतील जगातील पहिले संतचरित्र म्हणून संत एकनाथ महाराजांच्या ब्रेल लिपीतील चरित्राकडे पाहावे लागेल.’’- डॉ. सदानंद मोरे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.