महाराष्ट्र बातम्या
Krushna Andhale: मोठी बातमी! नाशिकमध्ये कृष्णा आंधळे दिसला; कुठल्या दिशेने गेला, हेही सांगितलं
नाशिकमधील गंगापूर रोडवरील दत्त मंदिराजवळ कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. त्याच्यासोबत एकजण होता. दोघेही काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर गेल्याचं बनकर यांनी सांगितलं.
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. कृष्णा आंधळेने मास्क घातला होता. त्याने मास्क खाली केल्यानंतर एकाने त्याला ओळखलं. शंभर टक्के तो कृष्णा आंधळेच होता, असं अॅड. गितेश बनकर यांनी म्हटलं आहे.

