

Dada Khindkar: संतोष देशमुख खून प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ज्या नेत्यांनी देशमुख खून प्रकरणात आवाज उठवला, त्यांच्याशी संबंधित लोकांचे जुने व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. यात सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांच्याशी संबंधित लोकांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसेच धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर याने ओंकार सातपुते नावाच्या तरुणाला मारहाण केली होती, त्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर खिंडकर पोलिसांना शरण आला.