

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख खून प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात मोठा राजकीच आणि सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. भाजप आमदार सुरेश धस हे पक्षातील आणि महायुतीतील नेत्यांवर गंभीर आरोप करत आहेत. त्यावर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भूमिका स्पष्ट केली असून पक्षश्रेष्ठींनी सुरेश धस यांना समज देण्याची मागणी केली आहे. शिवाय त्यांनी धस-मुंडे भेटीबद्दलही भाष्य केलं आहे. 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंकजा मुंडे बोलत होत्या. १५ मार्च रोजी ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.