
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले होते. या क्रूर हत्येला अनेक महिने उलटले, तरी देशमुख कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि बंधू धनंजय देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मिळावा, म्हणून रायगड किल्ल्यावर जाण्याचा निर्णय घेतला. आज, 352व्या शिवराज्याभिषेक दिनी, त्यांनी रायगडावर उपस्थित राहून न्यायाची मागणी केली आहे.