
जालना : मस्सजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून आरोपींनी त्यांना केलेल्या अमानुष मारहाणीची छायाचित्रे व्हायरल झाल्यावर मंत्री धनजंय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीमाना दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी करत मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी (ता. पाच) धरणे आंदोलन करण्यात आले.