sarkarnama.in : विशेष बातम्या

Sarkarnama
सोमवार, 8 मे 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

घरगुती, औद्योगिक वापरासाठी साखर दर वेगळे करण्याचा विचार
घरगुती वापरासाठी लागणारी साखर आणि औद्योगिक वापराच्या साखरेचे दर वेगवेगळे ठेवण्याचा राज्य सरकारच्या पातळीवर गांभीर्याने विचार सुरू आहे. राज्य सरकार तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविणार आहे.
पूर्ण बातमी इथे वाचा

रहस्यभेद :  सतेज पाटील यांनी उंबरठा ओलांडला असता तर... 
कोल्हापूर जिल्ह्यात "महाडीक विरुद्ध सतेज पाटील' हा संघर्ष सर्वांनाच माहिती आहे. कॉंग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडीक यांचे पुतणे धनंजय महाडीक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार आहेत. महादेवरावांचे पुत्र अमल महाडीक हे भाजपचे आमदार आहेत. कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांचा पराभव करून ते निवडून आले आहेत. परिणामी, कॉंग्रेसने महादेवराव महाडिकांना पक्षातून निलंबित केलेले आहे.
पूर्ण बातमी इथे वाचा

आत्महत्या होणार नाहीत असा प्रस्ताव विरोधकांनी द्यावा - दानवे
कर्जमाफी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत असतील तर कर्जमाफी करता येईल. सर्व विरोधकांना राजकीय जोडे बाजूला काढून एकत्र यावे लागेल. या राज्यात शेतकरी आत्महत्या करणार नाही असा ठोस प्रस्ताव द्यावा असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला.
पूर्ण बातमी इथे वाचा

उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर
आपल्या उद्योगी कार्यकर्त्यांमुळे अडचणीत आलेले साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी काल (रविवारी) पुण्यात आपल्या निवडक निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे. 
पूर्ण बातमी इथे वाचा

भावी मंत्र्यांकडे पी . ए . पदासाठी उतावीळ अधिकाऱ्यांनी लावली फिल्डिंग 
जहाज बुडू लागले की उंदीर आधी उडी मारून स्वतःचे प्राण वाचवतात अशी म्हण  आहे . या म्हणीनुसार मंत्रिमंडळ फेरबदलात  आपल्या मंत्री महोदयांचे आसनस्थिर  आहे की डळमळीत याची माहिती काढून अस्थिर मंत्र्यांच्या सेवेतील काही जण संभाव्य मंत्र्यांकडे फिल्डिंग लावू लागले आहेत . 
पूर्ण बातमी इथे वाचा

 

सरकारनामा ट्विटर

 

Web Title: sarkarnama news bulletin

टॅग्स