sarkarnama.in : विशेष बातम्या

Sarkarnama
बुधवार, 10 मे 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

बापट परत या...तुम्हाला कोणी रागावणार नाही
''पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आपण परत या, पुण्याचा प्रश्‍न मिटला आहे.....तुम्हाला कोणी काही रागवणार नाही, फक्त तुम्ही परत या,'' असे उपरोधिक फलक पुण्यात काँग्रेस पक्षाने लावले आहेत. आधीच्या सत्ताधारी पक्षावर भाजपने अशीच टीका केली होती. आता तशीच टीका सहन करण्याची वेळ भाजप नेत्यांवप आली आहे. मोक्‍याच्या वेळी पालकमंत्री शहरात नसल्याची बोच याद्वारे प्रगट झाली आहे.

भाजपच्या चित्रपट संघाचा 12 मे रोजी 'क्लॅप'
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपाठोपाठ आता भारतीय जनता पक्ष आता आपली चित्रपट सेना काढणार आहे. शुक्रवारी 12 मे रोजी भाजपच्या या चित्रपट संघाची 'क्लॅप' मारली जाणार आहे.

नाशिक झेडपीच्या उपाध्यक्षा नयना गावितांचे उद्या शुभमंगल
जिल्हा परिषदेच्या युवा उपाध्यक्षा कुमारी नयना गावित उद्या (ता.11 विवाहबंधनात अडकत आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या इतिहासत पहिल्यांदाच पदावर असतांना विवाह होत आहेत. या विवाहाची त्यांच्या कुुटंबियांकडून धुमधडाक्‍यात तयारी सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातही तो जारदार चर्चेचा विषय ठरला आहे. 

कोल्हापूर : पाईप लाईनच्या वादात शकुनीमामा , दुर्योधन आणि सरदारांचा उध्दार 
शहराच्या थेट पाईप लाईन योजनेवरून महापालिकेतील सत्तारूढ व विरोधी आघाडीकडून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपातून एकमेकांची उणीदुणी काढण्याचे काम सुरू आहे. 

... तर भाजपच्या "कॉंग्रेस मुक्त' स्वप्नाची सुरूवात मुंबईतून होईल
मुंबईतील कॉंग्रेसमधील पडझड रोखण्यासाठी दिल्ली हायकमांडने वेळीच पाऊल न उचलल्यास भाजपाचे कॉंग्रेसमुक्त भारत या स्वप्नाची मुंबईतूनच सुरूवात झालेली पहावयास मिळेल अशी भीती व्यक्त करतानाच मुंबईकडे लक्ष द्या अशी मागणी कॉंग्रेसच्या काही नगरसेवकांकडून आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. 

सरकारनामा ट्विटर
 

Web Title: sarkarnama news bulletin

टॅग्स