sarkarnama.in : विशेष बातम्या

Sarkarnama
मंगळवार, 6 जून 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

चंद्रकांतदादा अज्ञानी ; पवारांचा टोला !
 "महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना शेतीचे ज्ञान नाही आणि त्यांना समजावून सांगण्यासाठी मला वेळ मिळाला नाही', असा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला आहे. 
पूर्ण बातमी इथे वाचा

औरंगाबाद पोलिस आयुक्तांच्या हातावर घड्याळ कोण बांधणार ...!
कार्यक्रमांना नेहमीच उशिरा येणाऱ्या पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी रमजान ईदनिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीलाही तासभर उशीर केला. यामुळे कार्यक्रम विलंबाने सुरू झालाच परंतु, तासभर सुमारे बाराशे नागरिकांना ताटकळत बसावे लागले.
पूर्ण बातमी इथे वाचा

आमदार भरणे यांची कारकिर्द विझण्याच्या मार्गावर : हर्षवर्धन पाटील यांचा टोला 
"आमदारकीच्या गेल्या साडेतीन वर्षाच्या  कार्यकाळात कोण वैफल्यग्रस्त झाले याची संपूर्ण इंदापूर तालुक्‍याला आणि राज्यालाही माहिती झाली आहे. दिवा विझताना मोठा होऊन विझतो. त्याप्रमाणे दत्तात्रय भरणे यांची कारकिर्द आता विझण्याच्या मार्गावर आहेत. ते फक्त मोठी बडबड करीत आहेत.
पूर्ण बातमी इथे वाचा

जाळपोळ करण्यात राजकीय पक्षांचा  सहभाग, मुख्यमंत्र्यांकडून विरोधक लक्ष्य 
शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून कोण राजकीय पोळी भाजण्याचे काम करीत आहे. याची इत्थंभूत माहिती आपल्याकडे आहे. कालचा (सोमवारी) महाराष्ट्र बंदही राजकीय हेतून प्रेरित होता. मी असे म्हणत नाही की त्यामध्ये शेतकरी नव्हते. पण, जाळपोळ करण्यात राजकीय पक्षच होते असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 
पूर्ण बातमी इथे वाचा

आत्महत्यांवर उपाय - 2 रुपये किलोने धान्य - भाजपची सोशल मिडीया कॅम्पेन
शेतकरी आत्महत्यांवर रामबाण उपाय काय? तर आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना दोन रुपये किलोने धान्य वितरण. ही काही पारावरची वाचाळ चर्चा नव्हे. भाजपच्या 'मिडीया मॅनेजर्स'नी आखलेली 'सारे काही शेतकऱ्यांसाठी...' ही सोशल मिडीया कॅम्पेन आहे. शेतकरी संपाची सरकारविरोधी चर्चा व पोस्टचा नेटीझन्सकडून सोशल मिडीयावर पाऊस पडतोय.
पूर्ण बातमी इथे वाचा

 

सरकारनामा ट्विटर

 

Web Title: sarkarnama news bulletin

टॅग्स